प्रा. राजू सोनसळे यांची रिपब्लिकन सेनेच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी निवड 

सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश 

नांदेड (प्रतिनिधि)-आंबेडकरी चळवळीतील सक्षम युवा नेतृत्व प्रा. राजू सोनसळे यांनी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत काल मुंबई येथे रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. यावेळी प्रा. सोनसळे यांची नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव संजय बोधनकर, प्रदेश अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

नांदेड जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीत गेल्या वीस वर्षापासून सक्षमपणे काम करणारे युवा नेतृत्व म्हणून प्रा. राजू सोनसळे यांची ओळख आहे. विद्यार्थी दशेपासून आंबेडकरी चळवळीत स्वतःला वाहून घेतलेल्या प्रा. सोनसळे यांनी अनेक आंदोलने उभारली. विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी उभारलेल्या आंदोलनातून त्यांना न्याय मिळवून दिला . शोषित, पीडित , वंचितांच्या, न्याय हक्कासाठी अनेक आंदोलनात सहभाग घेतला. अनेक आंदोलने यशस्वीरित्या पार पाडली. त्यामुळे स्वकर्तुत्वावर निर्माण झालेल्या या नेतृत्वाने नांदेड जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीसह जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण ेली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून ते आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या सामाजिक राजकारणाचा ठसा जिल्ह्याच्या राजकारणात ठळकपणे उमटला आहे . रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत काल प्रा. राजू सोनसळे आणि मुंबई येथे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव संचय बोधनकर, प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला . त्यानंतर प्रा. राजू सोनसळे यांची नांदेड जिल्ह्याच्या उत्तर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .

या पक्षप्रवेश सोहळ्याला प्रदेश सचिव माधव दादा जमदाडे, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अनिल शिरशे, दक्षिणचे युवक जिल्हा अध्यक्ष प्रशांत गोडबोले यांची उपस्थिती होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रा. राजू सोनसळे यांची रिपब्लिकन सेनेतील निवड अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात असून यामुळे नांदेड उत्तर विधानसभेची समीकरणे बदलण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!