नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड तालुक्यातील सावरगाव थडी येथे एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 45 हजार रुपयांचा ऐवज चोरला आहे. मौजे धानोरा(बु) ता.उमरी येथील एक कृषी सेवा केंद्र दुकान फोडून चोरट्यांनी 20 हजार रुपयांचे साहित्य चोरले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मुलांचे वस्तीगृह क्रमांक 1 मधून एका विद्यार्थ्याचा 20 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप संगणक चोरीला गेला आहे.
सावरगाव थडी ता.मुखेड येथील माणिक नारायण मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर 2 ते 4 या वेळेदरम्यान त्यांच्या घराचे चॅनल गेट कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि घरातील कपाट चाबीने उघडून त्यातील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा 1 लाख 41 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरला आहे. मुखेड पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 305/2024 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस उपनिरिक्षक फड अधिक तपास करीत आहेत.
मौजे धानोरा(बु) ता. उमरी येथील धनंजय आनंदराव सलगरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे श्रीराम कृषी सेवा केंद्र आहे. दि.9 सप्टेंबरच्या सकाळी 7.30 ते 10 सप्टेंबरच्या सकाळी 8 वाेदरम्यान त्यांच्या आडत दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी त्यातून शेती पिकावर आवश्यक असलेले ऑल क्लिनर हे 20 हजार रुपयांचे साहित्य चोरून नेले आहे. उमरी पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 318/2024 नुसार दाखल केला आहे. पोलीस अंमलदार वडजे अधिक तपास करीत आहेत.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मुलांचे वस्तीगृह क्रमंाक 1 मध्ये राहणारे विद्यार्थी नारायण बाळासाहेब कापुरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 सप्टेंबरच्या सकाळी 10.30 ते दुपारी 4 वाजेदरम्यान त्यांच्या खोली ठेवलेला 20 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप संगणक कोणी तरी कडी आणि कुलूप काढून चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 819/2024 प्रमाणे नोंदवला आहे. पोलीस अंमलदार सातारे अधिक तपास करीत आहेत.