नांदेड(प्रतिनिधी)-छत्रपती चौकात 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेच्यासुमारास एका लहान बालिकेच्या गळ्यातील सोन्याचे बनविलेले पदक महिलांनी बळजबरीने तोडून नेले आहे.
मिनाक्षी गोविंदवार या महिला छत्रपती चौकात कटलरी व्यवसाय करतात. या महिला आपल्या कटलरी गाडीवर काम करत असतांना त्यांच्यासोबत त्यांची नातपण होती. तिच्या गळ्यात सोन्याचे पदक बनविलेले होते. त्यावेळी दोन महिला तेथे आल्या आणि एका महिलेने बालिकेचे गळ्यातील सोन्याचे पदक किंमत 7 हजार रुपये तोडून पळू लागल्या. नातीला झालेल्या त्रासामुळे ती ओरडली त्यानंतर मिनाक्षी गोविंदवारला ही बाब लक्षात आली. त्यांनी सुध्दा आरडाओरड केली. परंतू त्या दोन्ही महिला कॅनॉल रोडने पळून गेल्या. भाग्यनगर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 427/2024 नुसार दाखल केला आहे. पोलीस अंमलदार गजानन किडे अधिक तपास करीत आहेत.
बालिकेच्या गळ्यातील सोन्याचे पदक महिलांनी तोडले

One thought on “बालिकेच्या गळ्यातील सोन्याचे पदक महिलांनी तोडले”