नांदेड(प्रतिनिधी)-टॅम्पो ट्रव्हर्ल्स चालकाकडून दरमहा हप्ता अर्थात खंडणी द्यावी लागेल असे सांगून त्यांच्यावर तलवारीने हल्ला करणाऱ्या चार जणांविरुध्द वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनजितसिंघ रुपसिंघ रायके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्यासुमारास ते आपली टॅम्पो ट्रव्हर्ल्स गाडी एम.एच.26 एन.9036 उभी करून लोकांना त्यात बसवत असतांना गोविंदसिंघ पुजारी, सतनामसिंघ पुजारी, गोविंदसिंघचा भाचा निशानसिंघ, गोविंदसिंघचा मेहुणा भुपेंद्रसिंघ आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत सांगत होते की, येथून प्रवाशी बसवायचे असतील तर मला दरमहा 1 हजार रुपये हप्ता अर्थात खंडणी द्यावी लागेल. यापुर्वी सुध्दा गोविंदसिंघने दि.13 जून 2024 रोजी हप्ता मागितला होता. तेंव्हा मी आणि अनेकांनी मिळून त्याला 5 हजार रुपये दिले. तरी पण त्याच्या वागणूकीत बदल झालेला नाही.
वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम 308(2), 296, 115, 352, 351(2)(3), 3(5) आणि शसतरकायदा कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 452/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मंठाळे हे करीत आहेत.