8 वर्षीय बालिकेवर जघन्य अत्याचार; आरोपी पोलीसांच्या ताब्यात

नांदेड(प्रतिनिधी)-भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 8 वर्षीय भिल्लआदिवासी जमातीच्या बालिकेवर एका 20 वर्षीय युवकाने काल अत्याचार केला. त्या संदर्भाचा गुन्हा आज दाखल झाला. भोकर पोलीसांनी अत्याचार करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले आहे.
एका 8 वर्षीय बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार 7 सप्टेंबर रोजी त्यांचे पती केळी तोडण्याच्या कामासाठी बाहेर गावी गेले. सोबतच त्या स्वत:, त्यांच्या सासूबाई, जाऊबाई हे शेताच्या निंदनी कामासाठी गेले. सायंकाळी 5 वाजता परत आले असता घरातील सामान आस्थाव्यवस्थ पडलेले दिसले आणि 8 वर्षीय बालिका घराच्या कोपऱ्यात बसून रडत होती. आईने विचारल्यानंतर बालिकेने सांगितले की, काकाच्या घरी खेळण्यासाठी गेली. परंतू काकाचे घर बंद होते म्हणून ती परत आपल्या घराकडे येत होती. तेंव्हा काकाच्या घराशेजारी राहणाऱ्या बळीराम उर्फ बाळू संतोष चव्हाण याने तिला माझे सामान आणून दे म्हणून आपल्या घरात नेले आणि दार बंद केले. बालिकेच्या आईने तक्रारीत लिहिले या पुढील लिहिलेले शब्द लिहिण्याची ताकत आमच्यात नाही. एकंदरीत त्या बाळू चव्हाणने या बालिकेवर अत्याचार केला.
भोकर पोलीसांनी या बाबत आईची तक्रार घेतली आहे. वृत्तलिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार बाळू उर्फ बळीराम संतोष चव्हाणची जन्म तारीख 1 जानेवारी 2005 अशी आहे. या तक्रारीनुसार बाळू चव्हाण विरुध्द पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल होईलच . परंतू बालिकेसोबत केलेल्या अत्याचार हा समाजाने स्वत: वर आत्मपरिक्षण करण्यासाठी सांगत आहे. आपल्या बालकांना आणि युवकांना नक्कीच संस्कृती शिकवण्याची गरज आहे. प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार भोकर पोलीसांनी बळीराम उर्फ बाळू संतोष चव्हाणला ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!