नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी कत्तलीसाठी जाणारे गोवंश जातीचे 18 बैल व एक चार चाकी वाहन असा 19 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 5 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
चार सप्टेंबर रोजी नांदेड ग्रामीण येथील पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी बोंढार, धनेगाव मार्गावर एम.एच.20 ई.एल.7887 हे वाहन थांबवले. त्यामध्ये अत्यंत निर्धयीपणे बांधलेले होते. या बैलांची किंमत 4 लाख 17 हजार रुपये आणि गाडीची किंमत 15 लाख रुपये असा 19 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून शेख फेरोज रब्बानी (25), अबुजर बशीर कुरेशी(24), शेख जावेद शेख अजीज(35), शेख गुलाम रसुल शेख पिराण सर्व रा.बोरगाव सारवणी ता.सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव येथील हबीब खान हुसेन खान अशा पाच जणांना पकडून त्यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक 799/2024 दाखल करण्यात आला आहे. जनावरांच्या पालन पोषणासाठी सर्व जनावरे गोशाळेस देण्यात आली आहेत.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनशकुमार, पर पोलीस अधिक्षक ॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आदींनी नांदेड ग्रामीणचे पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने, पोलीस उपनिरिक्षक महेश कोरे आदींचे कौतुक केले आहे.