नांदेड(प्रतिनिधी)-सध्या झालेल्या अतिवृष्टीनंतर शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, विमा या बाबत लवकरात लवकर मदत करण्याचे आश्र्वासन दिले आहे. या पार्श्र्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक होवू शकते. त्यानुसार शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले आहे.
सध्या अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे पिक विमा, मदत या संदर्भाने कागदपत्र तपासणी व शेतकऱ्यांसाठी जाहीर झालेल्या योजनेसंदर्भाने शेतकऱ्यांना एखाद्या अनोळखी मोबाईल क्रमांकावरून कॉल येवू शकतो. परंतू त्यावर विश्र्वास ठेवू नका आणि त्यांना आपली माहिती सांगू नका असे पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी सांगितले आहे.
शेती विमा संदर्भात तुमचा मोबाईल नंबर तपासण्यासाठी ओटीपी पाठविल्यास तो शेअर करू नका, शेतकरी बांधवांनी या फसवणूकीबद्दल सावध राहावे, जेणे करून तुमच्या बॅंक खात्यातील रक्कम शुन्य होणार नाही. या कॉलमधून तुमच्या मोबाईलची सर्व माहिती मागवून त्यांनी पाठविलेल्या ऍपवर किंवा लिंकवर क्लिक करू नका. दुर्देवाने असा प्रकार घडलाच तर सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधा. सायबर ाखा टोल फ्र क्रमांक 1930 वर उपलब्ध असते. राष्ट्रीय स्तरावरील संकेतस्थळ htpp://cybercrime.gov.in आहे. नांदेड सायबर पोलीस ठाण्याच्या दुरध्वनी क्रमांक 02462-24027 असा आहे. नांदेड पोलीसांशी संपर्क साधण्यासाठी cybercell.nanded@mahapolice.gov.in ईमेलचा वापर करावा.