नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांच्या सन 2024 मधील सर्वसाधारण बदल्या जाहीर करतानंा पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी एकूण संख्येचे जवळपास 20 टक्के पोलीस अंमलदारांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांच्या यादीमध्ये 22 जणांची नावे पुर्वीच बदली झाल्यानंतर सुध्दा नवीन ठिकाणी जाण्यासाठी सोडले नाहीत अशा स्वरुपाची आहेत.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी सर्वसाधारण बदल्या 2024 जारी करतांना 22 जणांची नावे प्रथमत: लिहिलेली आहेत. ज्यामध्ये हे 22 पोलीस अंमलदार पुर्वीच बदली झाली असतांना सुध्दा अद्याप नवीन ठिकाणी हजर होण्यासाठी गेले नाहीत असे लिहिले आहे. यातील एक स्थानिक गुन्हा शाखेतील राजू दिगंबरराव पुलेवार यांची बदली बॉम्ब शोध व नाशक पथकात झाली असून ते तिकडे जाऊन हजर झालेले आहेत. इतरांबद्दल माहिती नाही तरी पण राजू पुलेवारचे नाव या यादीत आले आहे.या बदल्यांच्या आदेशात स्थानिक गुन्हा शाखेतील बऱ्याच जणांच्या बदल्या झालेल्या आहेत परंतू ते आजही स्थानिक गुन्हा शाखेतच काम करत आहेत आणि त्यांची नावे 22 जणांच्या यादीत नाहीत. म्हणजे वास्तव न्युज लाईव्हने मागेच लिहिल्याप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेतील ही मंडळी फक्त भिंत बदलून नवीन नियुक्ती देण्याचे नाटक रण्यात आले आहे हेच खरे वाटते.
इतर लोकांमध्ये पोलीस अधिक्षकांनी एकूण 633 पोलीस अंमलदारांच्या बदल्या केल्या आहेत. बदल्यांसाठी दिलेल्या वेळेप्रमाणे त्यांना स्वत: आपली बदली मागता आली नाही परंतू सर्वसाधारणपणे पोलीस अंमलदारांचा कल कसा असतो याची जाणिव ठेवून पोलीस अधिक्षकांनी या 633 बदल्या केल्या आहेत.
वाचकांच्या सोयीसाठी पोलीस अधिक्षकांनी केलेल्या बदल्यांच्या दोन पीडीएफ संचिका बातमी सोबत जोडल्या आहेत.