नांदेड(प्रतिनिधी)-27 ऑगस्टच्या तारखेत स्थानिक गुन्हा शाखेत सहा जणांना नियुक्ती दिल्याचे आदेश पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहेत. यामधील एक जण तर नांदेड ग्रामीण विक्री करणारा व्यक्ती आहे.
27 ऑगस्टच्या तारखेत 6 पोलीस अंमलदारांचे आदेश स्थानिक गुन्हा शाखेत नियुक्ती करण्यासाठी निर्गमित करण्यात आले आहेत. पण हे आदेश काल दि.1 सप्टेंबर रोजी सार्वजनिक झाले. यामध्ये नांदेड ग्रामीण येथील संतोष शिवन्ना बेल्लुरोड, इतवारा पोलीस ठाण्यातील तिरुपती संभाजी तेलंग, शिवाजीनगर येथील रविशंकर पद्माकर बामणे, वजिराबाद येथील बालाजी पंढरीनाथ कदम, नांदेड ग्रामीण येथील प्रभाकर दत्ता मलदोडे आणि मुक्रमाबाद येथील राजकुमार चंद्रकांत डोंगरे अशी ती सहा नावे आहेत.
26 ऑगस्ट रोजी एका बिनतारी संदेशानुसार जिल्हाभरातून स्थानिक गुन्हा शाखेत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना 27 ऑगस्ट रोजी मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. या मुलाखतीत जवळपास 350 पोलीस अंमलदार आले होते. पण फक्त 6 पोलीस अंमलदारांचे आदेश स्थानिक गुन्हा शाखेत करण्यात आले आहेत. इतर 346 पोलीस अंमलदार स्थानिक गुन्हा शाखेत काम करण्याची लायकीचे नसतील म्हणून असे करण्यात आले असावे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातून लोखंडी पुरूषच्या काळात सुट्टीवर असतांना वसुलीचे सर्व अधिकार ज्या पोलीस अंमलदाराकडे होते. त्यालाही स्थानिक गुन्हा शाखेत आणले आहे. त्याच पोलीस ठाण्यातील एक उत्कृष्ट पोलीस अंमलदाराचे नाव सुध्दा मागील पोलीस अधिक्षकांच्या यादीत होते आणि वसुली अधिकाऱ्याचेही होते. पण उत्कृष्ट पोलीस अंमलदाराचे नाव सहा जणांच्या यादीत नाही मात्र ज्याला फक्त वसुली माहित आहे त्याचे नाव या यादीत आहे. नांदेड ग्रामीणमध्ये उत्कृष्ट वसुली केली म्हणून त्याला स्थानिक गुन्हा शाखेत बक्षीस म्हणून नियुक्ती मिळाली असावी अशी चर्चाही सध्या सुरू आहे.याचा अर्थ असाच म्हणावा का ज्याप्रमाणे सन 2007 मध्ये नांदेडमध्ये सहाय्यक पोलीस अधिक्षक असलेले डॉ.मनोजकुमार शर्मा हे जेंव्हा पोलीस अधिक्षक झाले तेंव्हा ते एलसीबीला लोकल कलेक्शन बॅ्रंच असे म्हणत होते.