नांदेड-जिल्ह्यात व विविध प्रकल्पाच्या कॅचमेंट एरियामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढला आहे. दिग्रस बंधाऱ्याचे ४ दारे उघडली आहे.याशिवाय सिध्देश्वर धरणातूनही मोठया प्रमाणात पाणी सोडले जात आहे.पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथील विष्णुपुरी धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह असाच कायम राहिल्यास आणखी काही गेट उघडले जाऊ शकतात. नदीपात्राशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे, पूर परिस्थितीतील आवश्यक काळजी घ्यावी ,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
More Related Articles
कंत्राटी शिपाई पदाच्या भरतीसाठी संस्थानी 10 जुलैपर्यत अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नांदेड या कार्यालयासाठी सहा महिन्यासाठी…
पोलीसांकडे येणाऱ्या तक्रारीला दोन बाजू असतात, तुम्ही खऱ्याला न्याय द्या-शहाजी उमाप
नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीला दोन बाजू असतात. त्या दोन पैकी ज्याची बाजु खरी आहे…
माझ्याकडे चुकीला माफी नाही-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नांदेड(प्रतिनिधी)-माझ्याकडे चुकीला माफी नाही अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापुर इन्काऊटरवर उपस्थितांना प्रश्न…