नांदेड(प्रतिनिधी)-लोहा शहरातील शिवकल्याणनगरमधून अज्ञात चोरट्याने घरफोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असे दोन ठिकाणाहून 2 लाख 34 हजारांचा मुद्देमाल लंपास आहे. मारोती आनंदराव धोंडगे रा.शिवकल्याणकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घराचे कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील 16 ग्रॅम सोन्याचे दागिणे किंमत 35 हजार व रोख 2 हजार रुपये असे एकूण 37 हजार रुपये तर दिगंबर नारायण अंकले यांच्याघरून सोन्याची एक गंठी 4 ग्रम वजनाची, 5 ग्रॅम वजनाची एक अंगठी असे 9 ग्रॅम सोन्याचे दागिणे किंमत 46 हजार 400, रोख 1 लाख 20 हजार रुपये असा एकूण 2 लाख 34 हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत लोहा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 310/2024 नुसार दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यंाच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक पाटील हे करत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 771 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation डॉ. दीपेश कुमार शर्मा यांचा मोबाईल चोरणारा जेरबंद गोडाऊन फोडून विद्युत साहित्य चोरले, रिठ्ठा ता.भोकर येथे घरफोडले, होमगार्ड भरतीसाठी आलेलेल्या युवकाची बॅग चोरली