नांदेड,(प्रतिनिधी)-26 ऑगस्ट रोजी डॉ. दीपेश कुमार शर्मा यांच्या घरातून 20 हजार रुपयांचा मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला 48 तासात पकडून वजीराबाद पोलिसांनी डॉ. दीपेश कुमार शर्मा यांचा मोबाईल हस्तगत केला आहे.
दिनांक 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:53 वाजता मारवाडी धर्मशाळेच्या पाठीमागे घर असलेल्या डॉ. दीपेश कुमार द्वारकादास शर्मा यांच्या घराचे दार उघडे आहे आणि घरात कोणी नाही याचा फायदा घेऊन एका चोरट्याने त्यांच्या घरात ठेवलेला 20 हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरुन नेला होता. पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 427/2023 दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस अंमलदार कानगुलवार यांच्याकडे होता.
28 ऑगस्ट रोजी वजीराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.डी. वटाणे, पोलिस अंमलदार कानगुलवार, शरदचंद्र चावरे, बालाजी कदम, भाऊसाहेब राठोड, अंकुश पवार आदींनी डॉ. दीपेश कुमार शर्मा यांच्या घराच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून मोबाईल चोराला ओळखले आणि त्याला पकडून आणले.त्याचे नाव संघरत्न विलास दिपके राहणार देगाव चाळ नांदेड असे आहे.त्याच्याकडे डॉ. दीपेश कुमार शर्मा यांच्या मोबाईल सह इतर एक मोबाईल ज्याचा मालकी हक्क नाही असे एकूण दोन मोबाईल जप्त करण्यात आले या दोन मोबाईलची किंमत 35 हजार रुपये आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक निरीक्षक शहाजी उमाप,पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधीक्षक किरितिका सी.एम.यांनी वजिराबादचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे या कामगिरीसाठी कौतुक केले आहे.