नांदेड(प्रतिनिधी)-लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन बालिकेसोबत अत्याचार करणाऱ्या युवकाला पोक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आर.एम.पांडे तीन वर्ष सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
पोलीस ठाणे लिंबगावच्या हद्दीत राहणाऱ्या एका आईच्या तक्रारीनुसार 26 नोव्हेंबर 2019 रोजी तिची 7 वर्षीय बालिका आपल्या घराच्या अंगणात खेळत असतांना तिला किरण उर्फ छोट्या विश्वास तुळसे(19) याने मी तुला खेळण्यासाठी दोन चेंडू घेवून देतो असे सांगून सोबत घेवून गेला आणि हळदीच्या शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. ती ओरडू लागली तेंव्हा तिचे तोंड दाबले. त्यानंतर त्याने त्या बालिकेला शेताच्या बाहेर सोडले. हा प्रकार सायंकाळी 5.30 वाजता घडला होता. त्यावेळी मी व माझे पती कामासाठी गेलो होतो. लिंबगाव पोलीसांनी या तक्रारीनुसार भारतीय दंड संहितेच्या कलम 376(ए,बी) प्रमाणे गुन्हा क्रमांक 112/2019 दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक गणेश गके यांनी केला आणि न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले.
न्यायालयात हा खटला विशेष पोक्सो खटला क्रमांक 11/2020 नुसार चालू झाला. या खटल्यात एकूण 9 साक्षीदारांनी आपले जबाब न्यायासमक्ष नोंदवले. न्यायालयासमक्ष आलेल्या पुराव्यांच्या आधारावर न्यायाधीशांनी अल्पवीयन बालिकेवर अत्याचार करणाऱ्या किरण उर्फ छोट्या विश्वास तुळसेला पोक्सो कायद्याच्या कलम 7 आणि 8 नुसार तिन वर्ष सक्तमजुरी आणि 2 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्या सरकार पक्षाच्यावतीने विशेष अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍड.मनिकुमारी बत्तुल्ला(डांगे) यांनी बाजू मांडली. लिंबगावचे पोलीस अंमलदार शिवाजी सुब्बनवाड यांनी पैरवी अधिकाऱ्याचे काम पुर्ण केले.