नांदेड(प्रतिनिधी)-शेलगाव ताउमरी शिवारात आपल्या शेतात नवऱ्याने पत्नीला मारहाण करून दोरीने तिचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार 26 ऑगस्टच्या सकाळी 10 ते दुपारी 1.30 वाजेदरम्यान घडला आहे. साहेबराव हनमंत मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 ऑगस्ट रोजी आनंदा नारायण कदम (45) रा.शेलगाव याने आपल्याच शेतात त्यांची पत्नी गोदावरी आनंदा कदम (41) यांच्याशी भांडण केले. सोबतच गोदावरी बाईच्या डोळ्यावर मारहाण करून जखमी केले आणि नंतर तिचा गळाआवळून तिचा खून केला आहे. उमरी पोलीसांनी हा प्रकार भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) नुसार गुन्हा क्रमांक 299/2024 वर दाखल केला आहे. उमरीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक ए.एस.माने या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 1,525 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी अवैध दारूसंदर्भाने 179 गुन्हे दाखल; 13 लाख 28 हजार 680 रूपयांची दारू जप्त डॉ.दिपेश शर्मा यांचा मोबाईल चोरला