नांदेड(प्रतिनिधी)-शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाल्यामुळे विष्णुपूरी प्रकल्पाच्या वरील लाभ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे व दिग्रस बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आल्याने विष्णुपूरी प्रकल्पाचे दोन दरवाजे दि.24 रोजी सायंकाळी 5.20 वाजता उघडण्यात आले.
गोदावरी नदीवर असणाऱ्या दिग्रस बंधाऱ्यातून पाणी मोठ्या प्रमाणात नदी पात्रात सोडण्यात आले. यामुळे विष्णुपूरी प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला असल्यामुळे या प्रकरणाचे 15 आणि 17 क्रमांकाचे दोन गेट उघडून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदीपात्राच्या काठावरील नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर आणखी दरवाजे उघडावे लागणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.