हॉटेल सिटी सिंफनीमध्ये होता जुगार अड्डा; नऊ जुगारी पकडून 1 लाख 15 हजारांचा मुद्देमाल

नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलिसांनी त्यांच्या हद्दीत सिटी सिंफनी या हॉटेलमध्ये जुगार खेळणार्‍या नऊ जणांना पकडून त्यांच्याकडून 1 लाख 14 हजार 470 रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी घेतलेल्या पुढाकारानंतर नांदेड जिल्हयात अवैध धंद्याचे समुळ उच्चांटन करण्याची जबाबदारी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी घेतली. त्यांच्या मदलीला अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव पण आले आणि अवैध धंद्याविरूद्ध मोहिम सुरू झाली. 52 पत्त्यांचा जुगार अड्डा चालविणार्‍यांची वणवण सुरू झाली. आणि त्यातून त्यांनी हॉटेलमध्ये जुगार अड्डे सुरू केले. याची माहिती 23 ऑगस्ट रोजी विमानतळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार विमानतळचे पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण गुन्हे शोध पथकाचे प्रमख पोलीस उपनिरीक्षक विनोद साने, पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, पठाण, माने, स्वामी, सुखई, शोएब, भोसीकर, साईप्रसाद सोनसळे आदींनी रात्री 10 वाजेच्या सुमारास हॉटेल सिंफनी छापा टाकला. त्याठिकाणी जुगार खेळणार्‍या कांमध्ये जुगाराचे आरोपी गोविंद नरेंद्र जगेवासव (32) रा. साईनगर नांदेड,स.अख्तर स नसिर (29) रा साईनगर नांदेड, यज्ञेश लक्ष्मिकांत भोकरकर(38) रा. भोकर, विरसिंघ दिलीप सिंघ ठाकुर (32) लोहार गल्ली नांदेड,अरूण नागनाथ सोनटक्के (47) रा. नांदेड, सुनिल घुले (33)रा. रविनगर कौठा नादेड, शे. आसिफ शे. बाबु (30) या. खय्युम प्लाट देगलुरनाका, नांदेड,दिनेश पदमाकर चिमटावार (39) होळी नांदेड,उद्धव भानुदास टाक (39) रा.नविन कौठा नांदेड यांचा समावेश आहे. या नऊ लोकांकडून पोलिसांनी जुगार खेळण्याचे आणि रोख रक्कम असा 1 लाख 14 हजार 470 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या नऊ जुगार्‍यांविरूद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4 आणि 5 नुसार गुन्हा 335/2024 दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधीक्षक सुशीलकुमार नायक आदींनी उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या विमानतळ पोलिसांचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!