नांदेड(प्रतिनिधी)-आपण जन्म दिलेला मुलगा आपला नाही त्यासाठी डीएनए टेस्ट कर असे म्हणून पत्नीवर अन्याय करणाऱ्या नवऱ्याविरुध्द मनाठा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपले माहेर असणाऱ्या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार लग्नानंतर एक वर्षापासून मला नेहमीच माझा नवरा अमोल खंडूजी ढाले (26) रा.आगपुरी ता.घाटंजी जि.यवतमाळ हा माझ्या चारित्र्यावर संशय घेत असे आणि झालेला मुलगा हा माझा नाहीच त्यासाठी डीएनए टेस्ट कर आणि डीएनए टेस्ट केली नाही तर तुला जिवे मारतो अशा धमक्या देत असे. मनाठा पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 85, 352, 351(2) आणि 351(3) प्रमाणे गुन्हा क्रमांक 136/2024 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार गिरी यांच्याकडे देण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,387 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation गजेंद्र राजपूत विरुध्द एसीबीला तक्रार करणाऱ्या कंत्राटदाराविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल Dirigir sus tarjetitas de credibilidad https://credits-onlines.com/es/prestamos/simpleros-opiniones/ sobre forma importante