अर्धापूर (प्रतिनिधी)-दरवर्षी प्रमाणे अर्धापूर तालुक्याच्या सर्वात जुनी शाळा जिल्हा परिषद हायस्कूल येथे शाळेच्या गुणवंतांचा, पदोन्नती प्राप्त शिक्षकांचा , सावित्री माई फुले राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा , आणि बदलीने गेलेल्या शिक्षकांचा निरोप असा चतुरस्त्र दिमाखदार कार्यक्रम संपन्न झाला आहे.
जिल्हा परिषद हायस्कूलच्या सभागृहात सदरील कार्यक्रम संपन्न झाला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अर्धापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी लोकदाजी गोडबोले हे होते. प्रमुख पाहूणे म्हणून ऍड.किशोर देशमुख, प्रविण देशमुख, परभणी जि.प.चे सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी श्रीपाद देशपांडे, वसमतचे गटशिक्षणाधिकारी सोनटक्के, शा.व्य.स.चे मान्यवर लक्ष्मीकांत मुळे, मंजूर अली, शेख साबेर, संभाजी बासरे, उध्दवराव सरोदे, ऍड.गौरव सरोदे, गुणवंत विरकर, केंद्र प्रमुख विकास चव्हाण, मुदखेड पं.स.चे सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी गोडघासे, सेवानिवृत्त सेवाज्येष्ठ शिक्षक पुरुषोत्तमराव भोजनकर, अराजपत्रित मुख्याध्यापक डमरे , मधुकर उन्हाळे, हायस्कूलचे मुख्याध्यापक डॉ.शेख यांच्या आर्शिव स्वरुी उपस्थितीत कार्यक्रम दिमाखदार पध्दतीने संपन्न झाला.
मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचा सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ.शेख वजात नौशिन, पदोन्नती प्राप्त मुख्याध्यापक डमरे, बदलीने निरोप घेणारे सौ.सुमन कुलकर्णी, तसेच गुणवंत व यशवंत विद्यार्थी ज्यांनी दहावी, शिष्यवृत्ती तथा निट सारख्या परिक्षेत नेत्रदिपक यश प्राप्त करणारे कु.श्रावणी भोजनकर, कु.खदिजा अवज, राऊत प्रणव, शेख उमेमा, शेख कशीश फातेमा, पठाण उम्मे अमारा, जोगदंड शुभम, वापटकर कृष्णा, वापटकर विनायक या विद्यार्थीयांचे सत्कार करण्यात आले. मान्यवरांचे व सत्कारमुर्तींचा गौरव शाल, रोपटे, श्रावणी भोजनकर लिखीत पुस्तकाचे भेट अशा स्वरुप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पूष्पार्पण करुन, मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले, कार्यक्रमचे प्रास्ताविक शिवाजी मलदोड े यांनी केले, लक्ष्मीकांत मुळे, सुधीर गोडघासे, प्रविण देशमुख, डॉ.प्रज्ञानकुमार भोजनकर, सुमन कुलकर्णी , सौ.देवधर, सौ.मसुदा सुलताना, उध्दवराव सरोदे, डा.शेख एम.डब्ल्यू यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तथा अध्यक्षीय भाषण लोकदाजी गोडबोले यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.ज्योती सुधाकर पांढरे यांनी केले तर अत्यंत शानदार, आकर्षक असे संचलन शाळेच्या शिक्षिका सौ.परिणिता जयसिंगकार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी व्हावे यासाठी अनिल सुरवसे, नारायण इंगोले, सौ.संगीता गच्चे, सौ.रेणूका नाईक, सौ.संगिता हनवते, सुरेश कांबळे यांनी खूप कष्ट घेतले. कार्यक्रमास स्वागत गीत तथा संगिताची सुरेख साथ जमदाडे यांनी दिली तर शारदा स्तवन सौ.देवधर यांनी गायले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.