सिडको ते उर्वशी महादेव मंदिर नांदेड पर्यंत कावड यात्रा ऊत्साहात संपन्न

नवीन नांदेड : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको, श्रीराम जन्मोत्सव समिती, नांदेड महाआरती संघटना नांदेड आयोजित श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर साईनगर सिडको ते जुना मोंढा मार्ग श्री उर्वशी महादेव मंदिर गंगाचाळ नांदेड कावड यात्रा काढण्यात आली यंदाची ही कावड यात्रा बांगलादेश मधील हिंदूंवर असलेल्या अत्याचाराला समर्पित ही कावड यात्रा होती.

पाच दहा कावड , एका भक्ताने 40 लिटर कावड तयार करून आणली होती, पाण्याची तर लहान बालकांनी भूत अघोरींचे वैशभुषा साकारून कावड यात्रा मधील नागरिकांचे लक्ष वेधले ,कावड यात्रेमध्ये हर हर महादेव बम बम भोलेच्या गजरात नवीन नांदेड सिडको,नांदेड शहर दुम दुमले होते, तसेच जुनामोंढा येथे बांगलादेश विरुद्ध घोषणाबाजी ही करण्यात आली. सिडको पासून ते उर्वशी महादेव मंदिरापर्यंत व्यापाऱ्यांनी तथा शिवभक्तांनी कावड यात्रेचे स्वागत केले , सिडको येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ सुरेश जोशी यांच्या वतीने कावड यात्रेत सहभागी भक्तांना वाटप करण्यात आले, तर विविध ठिकाणी फळ, पाणी, दूध साबुदाणा वाटप करत आपला सहभाग नोंदवला ,महिला, पुुष बालक शिवभक्त यांच उपस्थिती लक्षणीय होती सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे नांदेड शहर भाजपा महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी नगरसेवकॲड.संदीप पाटील चिखलीकर, विनायक आकुरके,दिलीप सिंग सोडी सतीश कचवे शितल खांडील,विनोद कांचनगिरे, प्रकाश जिंदम,राजू निखाते यांच्या हस्ते आरती करून कावड यात्रा सुरुवात करण्यात आली होती.

कावड यात्रा यशस्वीतेसाठी संतोष उर्फ कालू ओझा,गणेशसिंह ठाकुर, गजाननसिहं चंदेल,मोहन पाटील,डॉ.रमेश नारलावार, कैलास यादव, शुभम गोपींनवार, संतोष अवधूतवार, शंतनू कच्छवे, मनमथ सांभाळे,महेश सूर्यवंशी,अभिषेक कटकुले, विशाल तुमा,पांडुरंग टोमके, साईनाथ कवणकर, वामसी पचनुरे, शिवम दुधाने, लक्ष्मीकांत शिरेवार ,श्रीराम तीपणवार, वैभव शेवनकर, ग्यानीसिंह ठाकुर, ओमकार नाईक, सुशील पिडगुळवार,अवधूत कदम,कृष्णा बियाणी,आदिनी परिश्रम घेतले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!