नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय हवामान खात्याने पुढील तीन तासात बीड-नांदेड-परभणी व सातारा या जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच नागरीकांना सतर्क राहण्यासाठी सांगितले आहे. हवामान खात्याने हा दिलेला इशारा 6.28 वाजताचा आहे. आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार मुसळपावसाला 1 तास शिल्लक आहे.
हवामान विभागाच्या नियंत्रण कक्ष मंत्रालय मुंबई येथून देण्यात आलेल्या माहितीनुसार पुढील तीन तासात म्हणजे 6.28 ते 9.28 या वेळेदरम्यान नांदेड, बीड, परभणी व सातारा या चार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर अर्थात सायंकाळी 6.28 वाजेनंतर नांदेड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे. पण तो मुसळधार नाही. पण आभाळ पुर्णपणे काळे आहे. म्हणजे पाऊस वाढू शकतो, मुसळधार होवू शकतो. त्यामुळे नागरीकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा जनतेला विनंती करते की, गोदावरी नदी काठी राहणाऱ्या नागरीकांनी आपला व शेजाऱ्यांचा जिव वाचविण्यासाठी, अडचणीत आलेल्यांना मदत करण्यासाठी तयार राहावे.