राष्ट्रीय क्रीडा दिन क्रीडा सप्ताहाचे आयोजन

नांदेड – राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगष्ट, 2024 रोजी साजरा करण्यात येतो. या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून याकरीता जास्तीत खेळाडूंनी सहभाग घ्यावा. तसेच सन 2023-24 या शैक्षणीक वर्षात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेवुन प्राविण्य प्राप्त खेळाडुनी आपल्या प्रमाणपत्राची सत्यप्रत व नावे 25 ऑगस्ट 2024  पर्यत जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड येथे जमा करावी. अधिक माहितीकरीता श्रीमती शिवकांता देशमुख (राज्य क्रीडा मार्गदर्शक) यांचेशी संपर्क, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, नांदेड व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेडच्यावतीने ऑलम्पिक वीर मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिन हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. तसेच महाराष्ट्राचे सुपुत्र ऑलम्पिक वीर कै.खाशाबा जाधव यांचे स्मरण करून, राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त नांदेड जिल्ह्य़ातील सन 2023-24 या शैक्षणिक वर्षांत राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेवुन प्राविण्य प्राप्त केलेल्या प्राविण्य प्राप्त खेळाडुचा राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 29 ऑगष्ट, 2024 रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड द्वारा सन्मान चिन्ह देवुन गौरव करण्यात येणार आहे.

राज्यामध्ये सध्या क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार होत असून अर्थात खेळाची प्रगती साध्य होणे आवश्यक आहे. याकरिता कार्यालयाच्या वतीने 26 ते 31 ऑगष्ट,2024 या कालावधीत पुढीलप्रमाणे खेळाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
1) चालण्याची शर्यत व बुध्दीबळ (19 वर्षे मुले-मुली) –26 ऑगस्ट 2024 वेळ स. 7 वा. जिल्हा क्रीडा संकुल, नांदेड
2) बॅडमिंटन (19 वर्षे मुले-मुली)- दि.27 ऑगस्ट 2024 जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, नांदेड व
खो-खो- तालुका क्रीडा संकुल, सिडको-नांदेड
3) टेबल टेनिस व बास्केटबॉल (19 वर्षे मुले-मुली)- 28ऑगस्ट 2024 जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर हॉल, नांदेड
4) व्हॉलीबॉल (19 वर्षे मुले-मुली)- दि.29 ऑगस्ट 2024- महात्मा फुले हायस्कुल, बाबानगर, नांदेड
5) हॉकी पॅनल्टी शुट आऊट (19 वर्षे मुले-मुली)- दि.29 ऑगस्ट 2024 – खालसा हायस्कुल, नांदेड
6) मिनी फुटबॉल (19 वर्षे मुले-मुली)- 30 ऑगस्ट 2024- इंदिरा गांधी मैदान स्टेडियम परीसर, नांदेड
7) टेनिसबॉल क्रिकेट (19 वर्षे मुले-मुली)- 31 ऑगस्ट 2024- इंदिरा गांधी मैदान स्टेडियम परीसर, नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!