नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्य भरातील पोलीस अधिक्षक ते पोलीस शिपाई अशा 1148 जणांना विशेष सेवा पदक जाहीर केले आहे. त्यात नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारक आळा घालण्यासाठी हे विशेष सेवा पदक देण्यात आले आहे.
राज्याच्या पोलीस महासंचालक रशमी शुक्ला यांच्या साक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या विशेष सेवा पदक प्रदान करण्याच्या आदेशात साताराचे पोलीस अधिक्षक शेख समीर शेख असलम, लातूरचे पोलीस अधिक्षक सोमय विनायक मुंडे, गोंदियाचे अपर पोलीस अधिक्षक अशोक दौलतराव बनकर यांच्यासह एकूण 1148 पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना हे विशेष सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे. त्यात राज्य राखीव पोलीस बल गट क्रमंाक हिंगोली, गडचिरोली, जालना, गोंदिया, नागपूर, मुंबई यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांचा समावेश आहे. या 1148 पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी विशेष करून गडचिरोली जिल्ह्यात आपल्या सेवा प्रदान केल्या आहेत.
वाचकांच्या सोयीसाठी विशेष पदक जाहीर झालेल्या 1148 पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांची पिडीएफ संचिका बातमी सोबत जोडली आहे.
विशेष सेवा पदक अधिकारी व अंमलदारांची यादी