14 ते 16 ऑगस्ट 2024 मध्ये रंगणार सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव 2024

आठवा सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव रंगणार 14 ते 16 ऑगस्ट कुसुम सभागृहामध्ये

नांदेडकरांना विविध प्रकारची संगीत नृत्याची सांस्कृतिक मेजवानी मिळावी म्हणून दरवर्षीप्रमाणे आठवा सप्तरंग सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन तीन दिवसांमध्ये येत्या 14 ते 16 ऑगस्ट 2024 दरम्यान नांदेड येथील कुसुम सभागृहात करण्यात आली आहे याची माहिती सप्तरंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सानवी जेठवाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नांदेड येथील सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणारी सप्तरंग सेवाभावी संस्था त्यासोबत लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स व संस्कृती मंत्रालय भारत सरकार जिल्हा प्रशासन नांदेड यांच्या सहाय्याने सदरील महोत्सव आयोजित होत आहे या महोत्सवामध्ये भारतातील सुमारे 12 राज्यातील 500 कलावंत आपली कलाकृती सादर करण्यासाठी नांदेड नगरीत येणार आहेत.

सदरील महोत्सवाची विभागणी दोन भागात करण्यात आली असून त्यात सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत दोन मंचावर विविध स्पर्धा ंगणार आहेत त्यात 14 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मंच क्रमांक दोन छत्रपती शिवाजी महाराज रंगमंचावर पोवाडा स्पर्धा सादर होणार आहेत तर रंगमंच क्रमांक एक स्वर्गीय पंडित बिरजू महाराज रंगमंचावर शास्त्रीय नृत्याच्या स्पर्धा रंगणार आहेत आणि दररोज सायंकाळी साडेपाच वाजता नांदेडकरांसाठी खास लावणी महोत्सव आयोजित केला आहे यात विविध लावणी कलाप्रकार पहाव्यास नांदेडकरांना जणू मेजवानीच ठरेल.

14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे व त्यात नांदेड येथील विविध सामाजिक कार्य करणाऱ्यां7ना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्यामध्ये वैद्यकीय सेवेसाठी डॉक्टर सुरेश दागडिया, कला सेवेसाठी पंकज शिरभाते संस्कृती संवर्धन साठी रविकिरण डोईफोडे साहित्य मध्ये डॉक्टर पी विठ्ठल, समाजकार्यासाठी तीन संस्थांची निवड करण्यात आली अक्सा ग्रुप, नवज्योत फाउंडेशन व स्वामी समर्थ मंदिर आणि अन्नछत्र नांदेड यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

यावर्षीचा स्वर्गीय भावना जेठवानी महिला भूषण पुरस्काराचे मानकरी आहेत श्रीमती चंद्रकला प्रभू आप्पा आलमखाने तर स्वर्गीय गीता जेठवाणी महिला भूषण पुरस्कार आहेत कुमारी रोहिणी इंगोले. नांदेड येथील instagram वरील स्टारचा देखील या दिवशी सत्कार होणार आहे. सदरील कार्यक्रमात पुणे येथील प्रसिद्ध शास्त्रीय भरतनाट्यम नृत्यांगना डॉक्टर श्रीमती सुचिता भिडे चाफेकर संगीत नाटक अकादमी पुरस्कृत यांना जीवन गौरव देण्यात येणार आहे त्यासोबतच नांदेड येथील प्रसिद्ध संगीत क्षेत्रात नावाजलेलं नाव सीता मोहनराव यांना देखील जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

तीन दिवसीय राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत लावणी शास्त्रीय नृत्यकला मॉडर्न फिल्म उपशास्त्रीय लोकनृत्य लोककला लोकसंगीत विविध वाद्यांची मेजवानी या कार्यक्रमात प्रेक्षकांना मिळणार आहे. यावर्षी विशेष म्हणजे तिन्ही दिवस तृतीय पंथी यांनी तयार केलेले कलाकृती व खाद्यपदार्थांची प्रदर्शनी व विक्री तिन्ही दिवस येणाऱ्या प्रेक्षक मान्यवरांसाठी असणार आहे. मागच्या वर्षीपून सरू करण्यात आलेल्या किन्नर अस्मिता पुरस्कार मध्ये यावर्षी विशेष निमंत्रित व सत्कारमूर्ती म्हणून येत आहेत आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी नई दिल्ली त्यासोबत श्री आर्यन पाशा हैदराबादहून पी संतोष कुमार सुभालक्ष्मी डॉक्टर प्राची राठोड मुंबई वरून माया अवस्थी हड्डी चित्रपट फिल्म विकी शिंदे हमसफर ट्रस्ट महाराष्ट्राची पहिली तृतीयपंथी प्रेस फोटोग्राफर जोया लोबो. अन त्याच दिवशी विशेष तृतीय पंथ यांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादरीकरण होणार आहे. त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अश्विनी चौधरी व ओमप्रकाश दरक करणार आहेत व मुंबईहून आलेले प्रणित हाटे यांनी करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!