नांदेड(प्रतिनिधी)-6 जणांनी सिडको भागातील स्मशानभुमीजवच्या नाल्याजवळ एका 17 वर्षीय बालकाला चाकुचा धाक दाखवून त्याच्या खिशातील 3 हजार रुपये लुटल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणातील चार जणांची नावे बालकाला माहित आहेत आणि इतरांची नावे माहित नाहीत. शुभम नामदेव पवार हा विद्यार्थी आणि त्याचा मित्र अनिल अंभुरे हे 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्यासुमारास आपल्या दुचाकीवर बसून हडको येथून घराकडे जात असतांना सिडको स्मशानभुमीजवळ दुचाकीवर आलेल्या 6 जणांनी त्यांना रोखले आणि धार-धार शस्त्राचा धाक दाखवून शुभमच्या खिशात असलेले 3 हजार रुपये बळजबरीने लुटून नेले आहेत. या दरोडेखोरांनी शुभम पवार आणि अनिल अंभुरे यांना मारहाणपण केली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 310(2), 115, 351(2), 351(3) आणि भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 नुसार गुन्हा क्रमांक 715/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक चव्हाण यांच्याकडे देण्यात आला आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,370 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation एकाच दिवशी अवैध दारु विकणाऱ्यांवर 93 गुन्हे; 2 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त कर्जाऊ रक्कमेचा हिशोब न दाखविणाऱ्याविरुध्द सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल