नांदेड(प्रतिनिधी)-भुखंडाचे अनेक फसवणूक प्रकार नेहमीच ऐकायला येतात. अशाच एका प्रकरणात तीन जणांनी एका भुखंडाची बनावट कागदपत्रे तयार करून त्यावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला म्हणून वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
भालचंद्र रविंद्र पत्की यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे वडील रविंद्र सखाराम पत्की यांचे एप्रिल 2022 मध्ये निधन झाले. रविंद्र विष्णुपंत पत्की यांचे परळीकर असे पण अडनाव होते. त्यांच्या आजी गंगाबाई सखारामपंत पत्की यांच्या नावे गंगानगर देगलूर नाका येथे भुमापन क्रमंाक 12657 मध्ये 1668 चौरस मिटर जागा होती. रविंद्र पत्की यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सुपूत्र भालचंद्र आणि त्यांच्या आईच्या नावाने आणि दोन भावांच्या नावाने वारसाआधारे नमुद झाली. भुमापन क्रमांक 12660 चे मुळ मालक रविंद्र सखाराम पत्की होते. त्या जागेतील अनेक भुखंड त्यांनी लोकांना विक्री केले होते. भालचंद्र पत्की यांना 24 जुलै 2024 रोजी ऍड.चाऊस यांच्यावतीने एक नोटीस प्राप्त झाली. ज्यामध्ये त्यांचे वडील हयात असतांना 12660 मधील भुखंड मोहम्मद युसूफ मोहम्मद इब्राहिम यास विक्री केली माहिती होती. परतू तसा कोणताही भुखंड त्यांनी विक्री केलेला नव्हता. शादुल सरदार शेख रा.उस्माननगर ता.कंधार आणि मुदतसिर मोहम्मद ईलियास रा.मदीनानगर नांदेड यांनी मोहम्मद युनूस मोहम्मद इब्राहिम याच्यासोबत संगनमत करून 2007 मधील भुमापन क्रमांक 12660 पैकी 30 फुट रुंद आणि 60 फुट लांब असा 1800 चौरस फुट भुखंड बनावट कागदपत्रांआधारे खरेदी केल्याचे दाखवले. त्या मुद्रांक कागदावर माझ्या वडीलांची खोटी स्वाक्षरी आहे असे भालचंद्र पत्की यांनी पोलीस प्राथमिकीमध्ये सांगितले आहे. या बनावट कागदपत्रांआधारे शेत सर्वे क्रमांक 169, गंगानगर देगलूर नाका येथील भुमापन क्रमांक 12660 पैकी 1800 चौरस फुट जागेचा ताबा घेण्याकरीता मोहम्मद युनूस मोहम्मद इब्राहिम, शादुल सरदार शेख व मोहम्मद मुदतसिर मोहम्मद ईलियास हे तिघे माझ्या मालकीचे व माझ्या ताब्यातील भुमापन क्रमांक 12657मध्ये बळजबरीने ताबा मिळविण्याचा प्रयत्नकरत आहेत.
वजिराबाद पोलीसांनी या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहितेतील कलम 318(4), 3(5) नुसार गुन्हा क्रमांक 393/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास वजिराबादचे सहाय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय मंठाळे हे करीत आहेत.