नांदेड(प्रतिनिधी)-महामार्ग पोलीस मदत केंद्र बारड येथील पोलीसांनी महाराष्ट्रातून तेलंगणाकडे जाणाऱ्या एका ट्रकची तपासणी केल्यानंतर त्यात स्वत: धान्याचा गहु असल्याचे दिसत होते. महामार्ग पोलीसांनी हा ट्रक सध्या बारड पोलीस ठाण्यात जमा केला आहे. महसुल विभागाची तपासणी झाल्यानंतर या बद्दल कार्यवाही होईल असे पोलीस सुत्रांनी सांगितले आहे.
नांदेड ते भोकर रस्त्यावर बारड येथे महामार्ग पोलीस मदत केंद्र आहे. तेथे असणाऱ्या पोलीसंानी आज 4 वाजता ट्रक क्रमांक आर.जे. 20 जी.बी.9480 ची तपासणी केली असता त्यात स्वत: धान्य दुकानाचा गहु असल्याचे पोलीसांना दिसले. महामार्ग पोलीसांनी तो ट्रक बारड पोलीस ठाण्यात आपल्या अहवालासह जमा केला आहे. या बद्दल पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या भागातील तहसीलदारांना या ट्रकची माहिती दिली जाईल आणि त्यानंतर तहसीलदारांच्या मार्गदर्शनात या ट्रकवर कायदेशीर कार्यवाही होईल असे सांगितले. प्राप्त माहितीनुसार हा ट्रक बुलढाणा येथून भरून आला होता आणि तो तेलंगणा राज्याकडे जात होता.