नांदेड(प्रतिनिधी)-दरोडा टाकून फरार असलेले तीन आरोप हिमायतनगर पोलीसांनी पकडून त्यांच्याकडून दरोड्यातील बराचसा ऐवज जप्त केला आहे.
वडगाव खुर्द ता.हिमायतनगर येथील प्रल्हाद भाऊराव मिरासे यांची 17 मे रोजी हिमायतनगर ते भोकर जाणाऱ्या रस्त्यावर सरसम येथील खवा सेंटरच्या वळणावर चार जणांनी चाकूचा धाक दाखवून 12 हजार रुपये किंमतीचा मोबाईल आणि 13 हजार रुपये रोख रक्कम अशी लुट केली होती. याबाबत गुन्हा क्रमांक 108 दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करतांना या गुन्ह्यात आरोपी चार नसून जास्त असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यात कलम 395 ची वाढ करण्यात आली.
या आरोपींचा शोध घेत असतांना 1 जून 2024 रोजी दोन जणांना अटक झाली. त्यांच्याकडून दोन मोबाईल व रोख रक्कम 3800 रुपये असा मुद्देमाल पुर्वीच जप्त करण्यात आला होता. उर्वरीत चार पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेतला असता हिमायतनगर पोलीसांनी लखन विनोद पिंपळे(23) रा.विठ्ठलवाडी ता.हिमायतनगर, कुणाल उर्फ लक्की वैजनाथ बोडावार (24) रा.दत्तनगर नांदेड आणि विजय तुकाराम अडबा(25) रा.तरोडा ु नांदेड यांना 3 ऑगस्ट रोजी पकडले. त्यांच्याकडून गुन्ह्यासाठी वापरलेला चाकु व 4 हजार 200 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, डॉ.खंडेराय धरणे, पोलीस उपअधिक्षक डॅनीयल बैन यांनी हिमायतनगरचे पोलीस निरिक्षक अमोल भगत, पोलीस उपनिरिक्षक निता कदम, पोलीस अंमलदार कोमल कागणे, शाम नागरगोजे, पवन चौदंते यांचे कौतुक केले आहे.