नांदेड(प्रतिनिधी)-शिवनगर नांदेड या भागात एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 73 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. बिलोली शहरातून दुचाकीच्या डिक्कीतून 60 हजार रुपये लांबविण्यात आले आहेत. दुधडेअरी ते धनेगाव या भागात उभ्या ट्रकच्या दोन डिस्क टायरसह चोरून नेण्यात आल्या आहेत. टेक्सकॉम टेक्सटाईल या कंपनीच्या 20 हजार रुपये किंमतीच्या लोखंडी जाळ्या चोरण्यात आल्या आहेत. सोमठाणा ता.भोकर येथे एक घरफोडून चोरट्यांनी 45 हजार रुपये रोख रक्कम चोरली आहे.
सोनाली विश्र्वनाथ ठाकूर रा.शिवनगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 जुलैच्या रात्री 11.30 ते 31 जुलैच्या पहाटे 6 वाजेदरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटातील सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम आणि होमथेअटर टी.व्ही. असा 1 लाख 73 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. विमानतळ पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 293 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक साखरे हे करणार आहेत.
सोमठाणा ता.भोकर येथून सुरेश अप्पाराव देशमुख यांचे घर चोरट्यांनी 29-30 जुलैच्या रात्री फोडले आणि त्याून 45 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेल आहे. भोकर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 331 नुसार दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार जाधव हे करीत आहेत.
अलीअब्दुल रशिद चाऊस यांच्या तक्रारीनुसार 27 जुलैच्या रात्री 11 वाजेच्यासुमारास त्यांनी आईच्या महिला बचत गटाचे 60 हजार रुपये आणले होते ती रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून किराणा दुकान बंद करण्यासाठी गेले. त्या दरम्यान दुचाकीच्या डिक्कीतील 60 हजार रुपये चोरले आहेत. बिलोली पोलीसांनी हा घटना क्रमांक 174/2024 नुसार दाखल केला आहे. पोलीस अंमलदार मुदेमवाड अधिक तपास करीत आहेत.
31 जुलै रोजी रात्री 1 ते पहाटे 4 वाजेदरम्यान टेक्सटाईल कंपनी एमआयडीसी नांदेड येथील सुरक्षा भिंतीवर लावलेल्या 6 लोखंडी जाळ्या 20 हजार रुपये किंमतीच्या कोणीतरी चोरून नेल्याची तक्रार टेक्सकॉमचे मॅनेजर हनमंत बालाजी ढगे यांनी दिलेल्यानंतर नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 665 प्रमाणे दाखल केला आहे. पोलीस अंमलदार मांजरमकर अधिक तपास करीत आहेत.
गौस खान गफार खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 जुलै रोजी त्यांनी आपला ट्रक क्रमांक एम.एच.40 सीडी 1170 हा दुरुस्ती करण्यासाठी दुधडेअरी चौक ते धनेगाव या दरम्यान असलेल्या गॅरेजमध्ये उभा केला होता. त्या ट्रकचे दोन डिस्क डायरसह 60 हजार रुपये किंमतीचे कोणी तरी चोरट्यांनी चोरले आहेत. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा प्रकार 668 प्रमाणे दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक गिते अधिक तपास करीत आहेत.