‘एक लाख मराठा ‘ उद्योजकांची संख्या पूर्ण अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कौतुक

मराठा समाजातील युवकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड :-अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील एक लाख उद्योजकांची संख्या पूर्ण झाली आहे.

मराठा समाजाला न्याय देणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले असून मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सह्याद्री अतिथीगृहावर सत्कार करण्यात आला आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना अंतर्गत आजपर्यंत एक लक्ष 14 लाभार्थी झाले असून या लाभार्थ्यांना 8320 कोटी रुपये बँकांनी व्यावसायिक कर्ज वितरित केले आहेत. त्यापैकी महामंडळांनी 832 कोटी रुपये व्याज परतावा केला आहे.

मराठा समाजाची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्रचित केले.या महामंडळाच्या माध्यमातून जुन्या योजना बंद करून नवीन सुधारित योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. या महामंडळाचे अध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची नियुक्ती केली होती.

नरेंद्र पाटील यांनी शासनाचे विविध विागाचे अधिकारी राष्ट्रीयकृत्व सहकारी बँकांचे प्रमुख महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी लाभार्थी तसेच अन्य संबंधितांनी या योजनेसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.

प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भातील कार्यालय असून मराठा समाजातील युवकांनी आपला नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मार्फत मदत घ्यावी असे आवाहन महामंडळाचे स्थानिक समन्वयक शुभम शेवणकर यांनी केले आहे. नांदेड जिल्हयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित कार्यालय जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उज्वल गॅस एजन्सी समोर, शासकीय तांत्रिक विद्यालय बाबा नगर येथे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!