मुखेड(प्रतिनिधी)-शहरातील प्राचिन असणाऱ्या श्री विरभद्र मंदिराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी हा निधी प्राप्त झाला असून या निधीमधून भव्यदिव्य असे मंदिर साकारले जाणार आहे. पण या मंदिराच्या पुजाऱ्यांना जाणिवपुर्वक मंदिर परिसरातून बाहेर काढण्याचे कटकारस्थान रचल जात आहे. आमचा मंदिर विकासाला विरोध नसून पुजाऱ्यांना बाहेर काढण्यास विरोध आहे, असे मत विरभद्र मंदिराचे पुजारी विरभद्र स्वामीजी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
मुखेड शहरात श्री विरभद्र स्वामी यांच मंदिर खुप प्राचिन आहे. हे मंदिर विरशैव लिंगायत धर्माचे कुलदैव म्हणून ओळखल जात. या मंदिराचे भक्त महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटका या राज्यासह अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात आहेत. येणाऱ्या भक्तांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी या मंदिर परिसराचा विकास केला जात आहे. मात्र या विकासाच्या नावाखाली याा ठिकाणच्या पुजाऱ्यांना बाहेर काढण्याच कटकारस्थान राजकीय मंडळींकडून केल जात आहे. विशेषत: हे मंदिर 155 या सर्व्हे नंबरमध्ये आहे आणि त्या ठिकाणचे राहणारे पुजारी हे 151 आणि 152 या सर्व्हे नंबरमध्ये पिड्यान पिड्यापासून त्यांचे वास्त्य हे. मात्र मुखेड नग परिषदेने तुम्ही मंदिर परिसरात अतिक्रमण केल म्हणून त्यांना नोटीसी देवून हे अतिक्रमण काढण्यात याव असा दबाव राजकीय मंडळीच्या दबावाला बळी पडून नगर परिषद प्रशासन करत आहे. मात्र आम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारच अतिक्रमण केल नसून आमच अनेक पिड्यांपासून या ठिकाणी वास्तव्य आहे. आमचा मंदिर परिसराच्या विकासाला अजितबात विरोध नाही असे मत श्री. विरभद्र मंदिराचे पुजारी विरभद्र शंकर स्वामी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.