बैठक घेवून 288 पाडायचे की उभे करायचे हा निर्णय घ्यावा लागेल
नांदेड(प्रतिनिधी)-अंतरवली सराटीत शांततेत उपोषण सुरू असतांना समोरच ओबीसींच उपोषण सुरू केल आहे. हा डाव फडणवीस यांचा असून त्यांनी छगन भुजबळांना सोबत घेवून टाकला आहे. ओबीसीतील काही पडेल लोकांना सोबत घेवून भुजबळ आरक्षणाचा विरोध करत आहे. याला फडणवीस यांच बळ आहे. मात्र भुजबळांना जर सोबत घेसाल तर भाजप सुपडा साप झाल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी नांदेड येथून दिला आहे.
मराठा आरक्षणाची शांतता रॅली ही मराठवाड्यात सुरु झाली असून ही हिंगोली, परभणी येथून दि.8 रोज सोमवारी दुपारी 2 वाजेच्यासुमारास नांदेड शहरातील राज कॉर्नर येथ मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली दाखल झाली. या ठिकाणी मराठा समाजाच्यावतीने त्यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. ही रॅली राजकॉर्नर ते वर्कशॉप, आयटीआय, शिवाजीनगर, कलामंदिर मार्ग छत्रपती शिवाजी महाराज अश्वरुढ पुतळा असे मार्गक्रम केल. या ठिकणी या रॅलीचा समारोप झाला. याा रॅलीत जिल्ह्यातील मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. यामध्ये लहान मुले, महिला, वृध्दसह तरुणांची संख्या अधिक होती. या रॅलीचा समारोप करतांना मनोज जरांगे म्हणाले की, फडणवीस यांना आमची विनंती आहे की, लवकरात लवकर आम्हाला आरक्षण देण्यात याव. फडणवीस यांनी भुजबळांना बळ देवू नये. त्यांनी भुजबळांना सांगितल की, ओबीसी समाजातील पडेल आमदार गोळा करा मी तुझ्या पाठीमागे आहे अशी ताकत त्यांनी भुजबळांना दिली. आंदोलनासमोर आंदोलन आणून बसवल आहे. याचाच अर्थ सरकारचा त्याला पाठींबा आहे. आम्हाला शांतते आंदोलन करायच आहे. हे युध्द शांतते जिंकायच आहे. शांततेच युध्द कोणालाही पेलत नाही.
मला चारही बाजूने घेरल असून मला एकट पडू देवू नका मी कधीही मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही, मला काही पाहिजे नाही, मी सर्व गोष्टींला लाथ मारून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ही लढाई लढत आहे. आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही त्रास दिला जात आहे. यासाठी समाज बांधवांनी त्यांचे रक्षण करावे. 57 लाख नोंदी सापडल्या आहेत. याचा जवळपास दीड कोटी समाज बांधवांना फायदा होत आहे. मला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. आम्ही फडणवीस आणि शिंदे सरकारला कधीही विरोधक मानलो नाही. यांनी तात्काळ आमच्या सगे सोयऱ्याचा कायदा पास करावा व अंमलबजावणी करावी अन्यथा समाजाची एक व्यापक बैठक घेवून 288 पाडायचे की, उभे करायचे हा निर्णय घ्यावा लागेल. ही वेळ सरकारने येवू देवू नये अशी विनंती मी नांदेडमधून सकरारला करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.