नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील गोदावरी नदीला पार करणारा आणि देगलूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या जुन्या पुलावर पासाळ्यामुळे उगवणारी झाडे साफ करून एका 75 वर्षीय व्यक्तीने जगासमोर आदर्श उभा केला आहे.
नांदेड शहरात असलेजला जुना पुल इंग्रजांच्या काळात दगड आणि चुन्याने बनविला आहे. त्यानंतर तयार झालेला अनेक किलांच्या तुलनेत आज हा पुल मजबुत अवस्थेत आहीे. य पुलाला बनवून 100 वर्ष झाली होती तेंव्हा. जवळपास 25 वर्षापुर्वी इंग्रजांनी नांदेडच्या साार्वजनिक बांधकाम विभाला पत्र लिहुन आम्ही तयार केलेल्या जुन्या पुलाला आता 100 वर्ष झाली असून या पुढे लक्ष देण्याची जबाबदारी तुमच आहे असे कळवले होते.
त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने याा पुलाला थोडी डाकडुजी केली. परंतू नंतर सर्वसामान्य नियमाप्रमाणे या पुलावर दरवेळेस विशेष करून पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे उगवतात. सर्वसामान्यपणे अशा झाडांकडे कोणी लक्ष देत नाही. आपल्या घरावर सुध्दा अशी अनेक झाडे पावसाळ्यात उघडतात .ती झाडे काढून टाकण्यात आपले कधी लक्ष नसले तर आपल्या घरातील वरिष्ठ मंडळी आपल्याला रागतात आणि मग आपण ती झाडे तोडतो. अशाच पध्दतीने जुन्या पुलावर उगवणाऱ्या झाडांबदल कोण-कोणाला रागवणार पण या ठिकाणी उगवलेल्या झाडांना ताोडून टाकतांनाचे एक चित्र व्हाटसऍपवर व्हायरल झाले. या वृध्द व्यक्तीचे वय बहुदा 70-75 या वयामधले आहे. एक 75 वर्षीय माणुस जुन्या ापुलावर उगवलेले तण साफ करून समाजापुढे एक आदर्शच तयार करत आहे.
भारतीय राज्य घटनेने आम्हाला भरूपर अधिकार दिलेले आहे. तसेच अनेक आमच्याा जबाबदाऱ्या सुनिश्चित केल्या आहेत. आम्हाला फक्त अधिकार माहित आहेत. जबाबदाऱ्यांकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो ही बाब सर्वात दुर्देवी आहे. ज्याप्रमाणे एक वयस्कार व्यक्ती हा पुल आपलाच आहे. या भावतेनू त्याकडे लक्ष देत आहे. ही बाब प्रशंनियच आहे. अशी अनेक कामे आपण सुध्दा ही सर्व संपत्ती आपलीच आहे असे समजून करू शकतो. उदाहरण द्यायचे असेल तर रेल्वेमध्ये, बसमध्ये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी ही सर्व आमच्याच मालकीची आहेत असा विचार केला तर आपल्यासमोर येणाऱ्या अनेक समस्या आपण स्वत: सांभाळून घेवू शकतो. काही गरज नसतांन या वयस्कर व्यक्तीने केलेल्या कामाची प्रशंसा करणे आमचे कर्तव्य आहे.