नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस विभागात सेवाअंतर्गत सुधारीत आश्वाशित प्रगती योजनेचा तिसरा लाभ जारी करून नांदेडचे पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी 382 पोलीसांचा त्यात समावेश केला आहे. हे सर्व पोलीस सन 1993 मध्ये पोलीस दलात भरती झालेले आहेत. नांदेडच्या या तिसऱ्या लाभाच्या मंजुरीची चर्चा राज्यभरात पोलीस दलात होत आहे.
पोलीसांच्या आश्वाशित प्रगती योजनेवर 1992 ते 2023 या दरम्यान अनेक प्रकरणे घडली, सुकाणू समित्या स्थापन झाल्या. उच्च न्यायालयाने यात दखल दिला आणि त्यानंतर 10, 20, 30 वर्षाच्या नियमित व अर्हताकारी सेवेनंतर पहिला, दुसरा आणि तिसरा लाभ देण्याचे ठरविण्यात आले. ज्यांना पुर्वी पहिला लाभ 24 वर्षातच मिळाला आहे. त्यांना पहिल्या लाभापासून 6 वर्ष सेवापुर्ण झाल्यावर तिसरा लाभ देण्यात आला आहे. आता 30 वर्षाची सेवापुर्ण करणारे पोलीस अंमलदार वेतनस्तर एस-14 मध्ये येणार आहेत. हा वेतनस्तर 36600-122800 दरम्यान आहे. आणि तिसऱ्या लाभात सर्व पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक परंतू श्रेणी लावून हे पद मंजुर करण्यात आले आहे.
नांदेड पोलीस अधिक्षकांनी जारी केलेल्या या तिसऱ्या लाभाची चर्चा राज्यातील सर्व पोलीस दलात होत आहे. वेगवेगळ्या पोलीस व्हाटसऍप ग्रपवर ांदेडच्या या आश्वाशित प्रगती योजनेच्या आदेशाची पीडीएफ संचिका व्हायरल झालेली आहे. आम्ही सुध्दा वाचकांसाठी ही पीडीएफ संचिका बातमीत जोडली आहे.
नांदेड जिल्हा आश्वाशित प्रगती योजनेतील तिसरा लाभ मंजुर केल्याचा आदेश आणि 392 पोलीसांची यादी पीडीएफ संचिकेत वाचकांसाठी जोडली आहे.