नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील 37 सहाय्यक पोलीस निरिक्षक आणि 23 पोलीस उपनिरिक्षकांच्या जिल्हा नियुक्तीमध्ये बदल करून त्यांना नवीन जिल्ह्यात नियुक्ती देण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ.शशिकांत महावरकर यांनी दिले आहेत.
सार्वत्रिक बदल्या 2024 या सदरात एकूण 36 सहाय्यक पोलीस निरिक्षकांच्या बदल्यांचा एक आदेश आणि एका सहाय्यक पोलीस निरिक्षकाचा एक स्वतंत्र आदेश असे 37 सहाय्यक पोलीस निरिक्षक बदलून देण्यात आले आहेत. तसेच 23 पोलीस उपनिरिक्षकांना आस्थापना मंडळाच्या मान्यतेनंतर जिल्हा बदलून देण्यात आला आहे. नांदेड येथून दुसऱ्या जिल्ह्यात जाणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन जिल्ह्याची नियुक्ती पुढील प्रमाणे आहे. विशाल दिपक भोसले, संगमनाथ माधव परगेवार, संतोष शंकरराव शेकडे, रघुनाथ तुळशिदास शेवाळे, संग्राम उध्दव जाधव (हिंगोली), आदित्य निवृत्तीराव लोणीकर, सुशांत गणपत किनगे, विजय दौलतराव जाधव, विनोद लक्ष्मण चव्हाण(परभणी), रवि वैजनाथ वाहुळे, रामदास माणिक केंद्रे , रविंद्र राजेंद्र कऱ्हे (लातूर), परभणी येथून नांदेडला येणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. संतोष शामराव सानप, बालाजी भानुदास गायकवाड, सरला शिनाथ गाडेकर, विकास भगवान कोकाटे, रवि माधवराव हुंडेकर असे आहेत. लातूर येथून नांदेडला येणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. दयानंद हरीषचंद्र पाटील, सुनिल पांडूरंग गायकवाड, प्रशांत दत्तात्रय लोंढे, रामचंद्र हरीशचंद्र केदार, बाळासाहेब विष्णु डोंगरे, नाना दिपक लिंगे असे आहेत. अशोक बालाजी घारगे हे लातूर येथून हिंगोलीला जात आहेत. हिंगोली येथून नांदेडला विलास सुदामराव चवळी यांची नियुक्ती झाली आहे. गजानन काळबा मोरे यांना हिंगोली येथून लातूरला पाठविले आहे. वसंत शेषराव मुळे यांना परभणी येथून लातूरला पाठविण्यात आले आहे. सुनिल अशोकराव गोपीनवार यांना हिंगोली येथून परभणीला पाठविले आहे.पंढरीनाथ चिन्नोड बौधनापौड हे हिंगोली येथून लातूरला जात आहेत. राजेश हनमनलु मलपिलु हे हिंगोली येथून परभणीला जात आहेत. आनंद नारायण बनसोडे यांना परभणी येथून हिंगोलीला पाठविले आहे.
नांदेड येथील शंकर भागचंद डेडवाल, श्रीनिवास कंठीराम राठोड, भालचंद्र प्रभाकर तिडके, संतोष वामनराव केदासे आणि लातूर येथील दिपाली विश्र्वनाथ गिते यांना सन 2025 च्या सार्वजनिक बदल्यापर्यंत मुदतवाढ दिली आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षकांच्या बदली आदेशात भारती कानबा वाठोरे यांचे स्वतंत्र आदेश काढून त्यांना लातूर येथून नांदेडला बोलावण्यात आले आहे.
बदल्या आदेशांमध्ये 23 पोलीस उपनिरिक्षकांना नवीन बदल्यांचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये देविदास मारोती नाटकरे, लक्ष्मण गंगाराम कोमवार (लातूर), किशोर दत्तात्रय पोटे (हिंगोली) या तिघांची सेवानिवृत्ती होत असल्याने त् यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नांदेड येथून बाहेर जाणारे पोलीस उपनिरिक्षक पुढीलप्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात दिली आहे. रहिम बशीर चौधरी, गणेश अशोक गोटके, प्रविण शिवाजीराव आगलावे (हिंगोली), शेख असद शेख चॉंद पाशा, संगिता रघुनाथ कदम, दशरथ गोविंदराव तलेदवार(परभणी), रेणुका बालाजी जाधव, व्यंकट बापुराव कऱ्हाळे(लातूर), अशोक बाबाराव कदम(परभणी), भाग्यश्री हनमंतराव कांबळे-हिंगोली(परभणी), सुरेश भगवानराव भोसले-हिंगोली(नांदेड), राधिका गिरधर भावसार-परभणी(नांदेड). परभणी येथून नांदेडला येणारे पोलीस उपनिरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. किशोर शामराव गावंडे, लहु रामजी घुगे, स्नेहा सखाराम पिंपरखेडे, जिलानी बशीरसाब मानुल्ला, राणी व्यंकटराव भोंडव, बळीराम व्यंकटराव राठोड असे आहेत. मुस्तफा मौजासाब परकोटे -परभणी (लातूर) देवानंद शंकर फडेवार-लातूर(नांदेड) असे आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना त्वरीत नवीन जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी कार्यमुक्त करावे असे आदेशा लिहिले आहे.