किनवट प्रा.सुरेखा राठोड हत्या प्रकरण; स्थानिक गुन्हा शाखेने सहा वर्षापासूनचा फरार आरोपी पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2018 मध्ये किनवट शहरात झालेल्या प्रा.सुरेखा राठोड खून प्रकरणातील एक आरोपी तेंव्हापासून अर्थात सहा वर्षापासून फरारच होता. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे यांनी पकडून पुढील तपासासाठी किनवट पोलीसांच्या ताब्यात दिल्यानंतर न्यायालयाने त्यास तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले होते. सध्या त्याची रवानगी तुरुंगात झाली आहे. सन 2018 मध्ये हा तपास स्थानिक गुन्हा शाखेनेच केला होता. तेंव्हाचे काही अधिकारी आणि पोलीस कर्मचारी किनवटमध्ये तळ ठोकून होते. पण गोविंदराव मुंडे यांनी पकडलेला आरोपी त्यांना सापडला नव्हता.
सन 2018 मध्ये किनवट शहरातील संस्था चालक प्रा.सुरेखा राठोड यांचा सकाळी 8 वाजेच्यासुमारास त्यांच्या घरात गळा चिरून खून करण्यात आला होता. याप्रकरणी सुरेखा राठोड यांचा नवरा यांच्यासह इतर तिघांना अटक झाली होती. त्यातील सुरेखा राठोड यांचा नवरा आजही तुरूंगातच आहे. इतर तिघांना न्यायालयाने जामीन दिला आहे. त्यावेळी स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदार अफजल पठाण यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी किनवट येथे तळ ठोकला होता. पण काही जण सांगतात कि आजही त्या गुन्ह्याचे खे आरोपी पकडले गेले नाहीत. का आणि कसे याचे उत्तर लिहिणे अवघड आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक गोविंदराव मुंडे, सहकारी पोलीस अंमलदार मारोती तेलंगे, संजय केंद्रे, शेख मोहसीन आदी देगलूर येथे घडलेल्या एका दरोडा प्रकरणातील आरोपीचा शोध घेत फिरत असतांना पोलीस ठाणे मरखेलच्या हद्दीतील चव्हाणवाडी येथे पोहचले. तेथे पोहचल्यावर त्यांनी मरखेलचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे, पोलीस अंमलदार पांढरे, कोल्हे आदींना सोबत घेवून चव्हाणवाडी येथे अशोक टोपा राठोड (45) रा.चव्हाणवाडी ता.देगलूर यास ताब्यात घेतले. त्याने किनवट येथे घडलेला गुन्हा क्रमांक 191/2018 मी केल्याचे कबुल केल्यानंतर त्याला पकडून त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी किनवट पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले होते.
या प्रकरणातील तिन जणांना न्यायालयाने जामीन देवून मुक्त केले आहे. मयत सुरेखा राठोड यांचा नवरा आजही तुरूंगातच आहे. सन 2018 मध्ये या गुन्ह्याचा झालेला तपास कसा-कसा झाला. त्यावेळेसच्या अधिकारी आणि अंमलदारांनी काय-काय केले. याचा शोध पुन्हा एकदा घेतला गेला तर नव्याने बऱ्याच माहित्या समोर येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!