नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात अनेक ठिकाणी मल्लनिस्सारण पाईप टाकल्यानंतर त्या ठिकाणी झालेले खड्डे बुजवले नाहीत. त्या खड्यांमुळे झालेल्या अपघाताला पाहुन जनतेतीलच एका माणसाने त्या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाचा पुस्टा उभा करून वाहन चालकांना आपल्यावतीने सुचना देण्याचा प्रयत्न केला आहे. यावरुन नांदेड महानगरपालिका जनतेसाठी काम करते की नाही हा प्रश्न समोर आला आहे.
भारतात प्रशासनिक व्यवस्थेमध्ये महानगरपालिकेने त्या भागातील भौतिक सुविधांना अद्यावत ठेवणे ही त्यांची सर्वात महत्वपुर्ण जबाबदारी आहे. त्यासाठी ते कर वसुल करतात. सोबतच महानगरपालिकेच्या हद्दीत होणाऱ्या कामांसाठी राज्य शासन, केंद्र शासन यांच्या योजना सुध्दा असतात आणि त्यातून ते विकास कामे केली जातात. रस्त्यांबद्दलचा विषय बोलायचा असला तर काही रस्ते महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहेत तर काही रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहेत.
नांदेड शहरात काही भागांमध्ये मल्लनिस्सारण वाहिनी नवीन टाकण्यात आली. त्यात काही फुट काम करण्यात आले, काही तसेच सोडून देण्यात आले, त्यानंतर पुढे नवीन काम करण्यात आले. आजही हे काम पुर्ण झालेले ाही. शहरात अर्धवट झालेल्या या कामामुळे अनेक जागी खड्डे पडलेले आहेत. शहरातील गुरूद्वारा चौक ते महाविर चौक येणाऱ्या रस्त्यावर मल्लनिस्सारण वाहिनीच्या कामामुळे झालेले खड्डे महानगरपालिकेने मात्र बजुवले नाहीत. त्या ठिकाणी झालेल्या खड्यांमुळे अनेक अपघात घडू लागले. आज सकाळी या रस्त्यावर एक पांढऱ्या रंगाचा बोर्ड उभा केलेला दिसला. त्या ठिकाणी थांबून त्याची माहिती घेतली असता ज्या माणसाने या ठिकाणी होणारे अपघात पाहिले. त्यालाच लाच वाटली आणि त्यानेच मग हा पांढऱ्या रंगाचा पुस्टा उभा करून वाहन चालकांना या ठिकाणी खड्डे आहेत असे दिशादर्शक दाखविले आहे.
ज्या कामावर हा प्रकार दाखविण्यात आला आहे. हे काम एप्रिल महिन्यात झालेले आहे. म्हणजे आज तीन महिने होत आले तरी पण त्या ठिकाणी तयार झालेले खड्डे बुजविण्यात आले नाहीत. शहरातील प्रत्येक संपत्ती धारकाच्या कर मागणी बिलामध्ये रोड टॅक्स असतोच. तरीपण घाणेरड्या रस्त्यावरून जाण्याची वेळ नांदेडकरांना आली आहे आणि महानगरपालिका आणि त्यातील प्रशासन आम्ही किती दुधाने नाहलेलो आहोत हे दाखविण्यातच मग्न आहेत.