नांदेड(प्रतिनिधी)-सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतकऱ्यांची लागवडीसाठी धावपळ सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील प्रत्येक बीज लावण्याअगोदर त्याची बीज प्रक्रीया करूनच लावावे यामुळे उगवण क्षमता चांगल्या प्रकारे होवू शकते असे आवाहन कंधार तालुका कृषी अधिकारी व्ही.बी.गिते यांनी केले.
डॉ.पंजाबराव देशमुख यांची 125 व्या जयंतीनिमित्त कृषी संजीवनी सेवा पंधरवाडा निमित्ताने शिराढोण येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच खुशाल पांडागळे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून एस.बी.राठोड, मंडळ कृषी अधिकारी, एस.डी. वारकड, बी.बी. डफडे, एस.डी.उबाळे, सतिश गोगदरे, एम.एस.राठोड या कृषी सहाय्यकांची उपस्थिती होती. याचबरोबर मुक्ताराम पांडागळे, ग्रामपंचायत सदस्य धर्माजी कपाळे, तंटामुक्त अध्यक्ष सदाशिव अप्पा देवणे व शेतकरी यांची उपस्थिती होती.
कृषी संजीवनी सेवा पंधरवाडा 17 जून ते 1 जुलै या कालावधीत राज्यात साजरा केला जात असून या कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व त्यांच्या जनजागृती करण्यासाठी कृषी विकासाच्या विविध योजनेची सविस्तर माहिती या कार्यक्रमात देण्यात आली. याचबरोबर पी.एम.एफ.एम.ई योजनेबद्दलही भानुदास शिराळे यांनी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिराढोण येथील कृषी अधिकारी एम.एन.इंगेवाड यांनी केले.