नांदेड(प्रतिनिधी)-आरक्षण बचावचा नारा देत ओबीसी समाजाने नांदेड जिल्ह्यात आक्रमक पवित्रा घेतला आहे. नांदेड-लातूर राज्य महामार्गावरील माळाकोळी येथील समाज बांधवांनी रस्ता रोको आंदोलन करून शासनाचा तिव्र निषेध व्यक्त केला तर दुसऱ्या बाजूला भोकर येथे सरणावर बसून आमरण उपोषण सुरू केल आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यात ओबीसीही आता आरक्षण बचावसाठी जागो-जागी आक्रमक होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे मागील 8 दिवसांपासून प्रा.लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण बचाव समर्थनार्थ आरक्षण बचाव आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते उपोषणस्थळी प्रा.लक्ष्मण हाके यांना भेटण्यासाठी जात आहेत. तर अनेकांनी रस्ता रोको करत काही ठिकाणी आमरण उपोषण करत समर्थन देत आहेत. भोकर येथे मराठा समाजाला आरक्षण देवू नये, सगे सोयरे संदर्भातील कायदा काढण्यात येवू नये या मागणीसाठी 20 जूनपासून एक आगळेवेगळे आंदोलन भोकरमध्ये सुरू करण्यात आले आहे. संंजय दिगंबर गौंड यांनी सरणावरर बसून आपले उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजाा ओबीसीमध्ये समाेश झाल्यास ओबीसीच्या संविधानीक आरक्षणाचा हक्क हिरावला जाईल. त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणात सगे सोयरेच्या नावाखाली घुसखोरी नको अशी मागणी करण्यात आली आहे.
जालना येेथे मागील आठ दिवसांपासून ओबीसी आरक्षण बचाव समर्थनार्थ प्रा.लक्ष्मण हाके हे उपोषणास बसले आहेत. यांच्या समर्थनार्थ लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे ओबीसी बांधवांनी नांदेड-लातूर राज्य महामार्ग अडवून रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी तिव्र भावना व्यक्त करत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणत्या एका जातीचे नसून त्यांना महाराष्ट्रातील संपुर्ण जाती सारख्याच आहेत. यामुळे मराठा समाजाची बाजु घेणे हे संविधानीक दृष्टीकोणातून लागू पडत नाही. जर त्यांना मराठा समाजाचा पुळका येत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आणि मुख्यमंत्र्यांनी सर्वांना समान न्याय देण्याची भुमिका घ्यावी. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन या ठिकाणी असणाऱ्या पोलीस प्रशासनाला दिले.