नांदेड(प्रतिनिधी)-सन 2022-23 च्या निवड सुचिमध्ये प्रलंबित राहिलेल्या पोलीस निरिक्षकांच्या पदन्नन्नत्या आणि नवीन पदस्थापना पोलीस महासंचालक रशमी शुक्ला यांनी जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातून पाच सहाय्यक पोलीस निरिक्षक बदलून दुसरीकडे पोलीस निरिक्षक या पदावरून जाणार आहेत. तर नांदेडला येणाऱ्यांची संख्या 4 आहे. या बातमीसोबत पदेन्नती झालेल्या 449 पोलीस निरिक्षकांची पीडीएफ फाईल वाचकांच्या सोयीसाठी जोडली आहे.
सन 2022-23 च्या पदोन्नत्या दिण्यासाठी निवड सुची जाहीर झाली होती. त्यामध्ये 449 जणांची नावे आहेत. या निवड सुची विरोधात अनेक जणांनी न्यायालयात प्रकरणे दाखल केली. त्या सर्व प्रकरणाचा उहापोह करून पोलीस महासंचालक रशमी शुक्ला यांनी 449 सहाय्यक पोलीस निरिक्षकांना पोलीस निरिक्षक पदावर पदोन्नती देवून त्यांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यात कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक सोपान सोपानी चितमलपल्ले आणि स्वप्निल विजयकुमार धांडगे हे मुंबई शहरात जात आहेत. बालाजी रामरा भंडे यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर येथे नियुक्ती मिळाली आहे. शिवराम राजाराम तुगावे यांना अनुसुचित जात प्रमाणपत्र तपासणी समित पुणे ेथे नियुक्ती मिळाली आहे. राजेंद्र भानुदासराव सरोदे यांना धाराशिव येथे पाठविण्यात आले आहे.
इतर ठिकाणावरून नांदेडमध्ये पदोन्नती घेवून येणारे पोलीस निरिक्षक पुढील प्रमाणे आहेत. त्यांची जुनी नियुक्ती कंसात लिहिली आहे.
राजेश अशोकराव पुरी(यवतमाळ), महेश सजन माळी(अहमदनगर), बाळासाहेब लक्ष्मण रोकडे (नवी मुंबई),अतुल श्रीधर भोसले (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग). या बातमी सोबत पोलीस महासंचालक कार्यालयाने सहाय्यक पोलीस निरिक्षक ते पोलीस श्रसनिरिक्षक पदाची जाहीर केलेली 449 जणांची यादी पीडीएफ संचिकेत जोडली आहे.