नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा महानगरपालिकेने केतन नागडा यांच्या सात पिढ्यांचे भले करण्यासाठी नवा मोंढा येथील जागा दिली. त्या जागेवर अद्याप बांधकाम परवानगी सुध्दा घेण्यात आलेली नाही आणि तेथे काम सुरू झाले आहे. या संदर्भात आम आदमीचे प्रवक्ता ऍड.जगजीवन भेदे व इतर अनेकांनी महानगरपालिकेत अर्ज देवून या जागेवर सुरू असलेले बेकायेदशीर बांधकाम रोखण्यात यावेत. अशी विनंती केली आहे. नसता आंदोलनाचा मार्ग पत्कारला जाईल असे अर्जात लिहिले आहे.
आम आदमीचे प्रवक्ता ऍड.जगजीवन तुकाराम भेदे यांनी महानगरपालिकेकडे अखीव पत्रिका(सीटी सर्व्हे नंबर) 11064 या जागेचे हस्तांतरण कोणाला केले आहे. याची माहिती विचारली होती. त्या अर्जावर महानगरपालिकेने शासकीय गोदाम अर्थात सिटी सर्व्हे नंबर 1164 ची जागा बीओटी विकास तत्वावर विकासक मे.जिनेन इंफ्रा नांदेड यांना महानगरपालिकेचा ठराव क्रमांक 80 दि.28 ऑक्टोबर 2022 नुसार देण्यात आल्याचे उत्तर दिले. दुसऱ्या प्रश्नाच्याा उत्तरात व्यापारी संकुल बीओटी तत्वावर उभारण्यासाठी विकासक मे.जिनेन इंफ्रा नांदेड यांना दिले आहे. पण अद्याप प्रतित बांधकामासाठी विकासकास बांधकाम परवानगी देण्यात आलेली नाही असे लिहिले आहे.
आम आदमी पार्टीने दिलेल्या अर्जानुसार महानगरपालिकेने कोणत्याही ठोस विचार न करता ही जागा 9 कोटी 83 लाख 60 हजार रुपयांचा भरणा करुन घेवून जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडून हस्तांतरीत करून दिली आहे. मे.जिनेन इंफ्रा नांदेड अर्थात केतन नागडा कारण जिनेन हे केतन नागडाचे सुपूत्र आहेत. यांना परवानगी नसतांना सुध्दा त्या ठिाकणी मोठ- मोठ्या मशिन आणून कामाची सुरूवात झाली आहे. या जागेवर सुरु असलेले बेकायदेशीर बांधकाम त्वरीत रोखावे असे या अर्जात नमुद आहे. या अर्जावर ऍड.जगजीवन भेदे यांच्यासह सुमंत खारकर, कपिल किशोर जोंधळे, माधव कांबळे, किशोर शिवराम जोंधळे, बेबीताई संदीप चव्हाण, विनोद प्रल्हाद खरे, लक्ष्मीबाई आशिष लिंगायत, गंगाधर निवृत्ती मोकमपल्ले, अश्र्विनी प्रल्हाद खरे, रेरक किशोर गजभारे, अनिकेत माधव कांबळे, शंकर लक्ष्मण भालेराव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
जुन्या गोदामाचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी सर्व बाजूने पत्रे लावण्यात आली आहेत. त्यामुळे आत काय चालू आहे हे दिसत नाही. एखाद्या गदीबाने एखादा ओटा बिना परवानगीने उभारण्यास सुरूवात केली तर तो ओटा पाडण्यात महानगरपालिकेला रस असतो. सोबतच तो ओटा पाडण्याची छायाचित्रे पाठवून बातमी प्रसिध्द केली जाते. या कामकाजामध्ये मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, हे एक समन्वयक आहेत. कारण सुरू असलेल्या ा बांधकामाचे लेआऊटच आज उपलब्ध नाही. तर मग त्या ठिकाणी काम कसे सुरू आहे हा कायम अनुत्तरीत राहणारा प्रश्न आहे. ती इमारत तयार होईपर्यंत सुध्दा या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही.