सुशिलाबाई वझरकर यांच्या मृत्यनंतर त्यांच्या कुटूंबियांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे देहदान केला

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील ज्येष्ठ नागरीक सेवानिवृत्त शिक्षीका सुशिलाबाई मधुकरराव वझरकर आज यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या मुलांनी त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयाला दान केला. पारंपारिक पध्दतीला वगळून घेतलेला हा निर्णय योग्य आहे.
नांदेडमध्ये जिल्हा परिषदेमध्ये शिक्षीका या पदावर कार्यकरून सुशिलाबाई मधुकरराव वझरकर या सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्यांचे पती मधुकरराव वझरकर हे सुध्दा उपजिल्हाधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले होते.आज सकाळी 7 वाजेच्यासुमारास सुशिलाबाई वझरकर ह्या दैनंदिनीप्रमाणे कामकाज करत असतांना त्यांनी आपले पुत्र डॉ.सुनिल वझरकर यांना सांगितले की माझ्या पाठीत दु:खत आहे. सुनिल वझरकर यांनी आपण बसा मी दाबून देतो असे सांगितले आणि त्यांना खुर्चीवर बसवून डॉ.सुनिल त्यांच्या जवळ आले तेंव्हा त्यांची प्राणज्योत मावळली.
सुशिलाबाई मधुकरराव वझरकर (88) यांनी आपल्या जीवंतपणीच आपला देहदान करण्याची इच्छा व्यक्त केलेली होती. त्यांच्या इच्छेनुसार डॉ.सुनिल वझरकर यांनी आपल्या आईचा देह वैद्यकीय महाविद्यालयाला दान दिला. सुशिलाबाई वझरकर यांचे अनिल, सुनिल आणि संतोष असे तीन पुत्र आहेत. तसेच मिरा आणि मिना अशा मुल आहेत. कोणालाही न बोलवता सकाळी 11वाजता वझरकर कुटूंबियांनी आपल्या आईचा देह वैद्यकीय महाविद्यालयास दिला. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातु, पणतु, दोन मुली, जावई, नातुु असा मोठा परिवार आहे.
पारंपारिक पध्दतीला वगळून डॉ.सुनिल वझरकर यांनी आपल्या आईच्या इच्छेनुसार त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयास दिला. सध्याच्या परिस्थितीत अवयव दान या चळवळीला सुध्दा मोठे यश येत आहे. सुशिलाबाई वझरकर अत्यंत चालत्या-बोलत्या परिस्थितीत आपला जिवनप्रवास संपवून निघुन गेल्या आहेत. त्यांच्या शरिरातील काही अवयव इतरांना कामी येवू शकतील. तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यातून भरपूर काही शिकायला मिळेल. सर्वसामान्य जनतेत सुध्दा देहदान आणि अवयव दानाची पध्दत वाढली पाहिजे. वास्तव न्युज लाईव्ह वझरकर कुटूंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!