नांदेड – पावसाळा सुरू झाला आहे. गेल्या दोन तीन वर्षों पासून आपल्या नांदेड जिल्ह्यात वीज पडून अनेक लोक मृत्युमुखी पडल्या च्या व करंट लागुन मृत्यू पावलेल्या अनेक घटना घडल्या आहेत.नैसर्गिक आपत्तीला पुर्ण पणे थांबविणे माणसाच्या हातात नाही. परंतु आपण थोडी काळजी घेतली तर यातुन सुटका करून आपल्या व आपल्या परिवाचे जीवीत हानी होण्याचे टाळता येते. तसेच सुरक्षित जीवन जगु शकतो. फक्त आपल्याला योग्य शास्त्रीय पद्धतीने माहिती नसल्याने अनेकांना नाहक बळी पडून जीव गमवावे लागते.सर्व प्रथम आपण जाणून घेऊ वीज म्हणजे काय? आकाशात वीज कुठुन येते? ती खाली पडताना कोणत्या ठिकाणी पडण्याची जास्त शक्यता असते? चला सर्व प्रथम वीज म्हणजे सर्व साधारण भाषेत सांगायचे तर एक प्रकारची उर्जा आहे. तसे शैक्षणिक दृष्ट्या वीजेची व्याख्या वेगळी आहे. आकाशात वीजनिर्मिती होते म्हणजे भौतिकशास्त्राचा एक नियम असा आहे की दोन वस्तू एक मेकांना घासले गेले तर त्या मध्ये वीजनिर्मिती होते.जसे दोन गारगोट्या एकमेकांना घासले असता त्या मधून णग्या निघतात ती ही वीजच होय . परंतु अशा वीजेला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेता येत नाही.असेच आकाशात दोन पाण्याने भरलेले ढग जेव्हा एक मेकावर आदळतात अथवा एक मेकांना घासले जातात त्या वेळी त्या ठिकाणी मोठा आवाज होऊन खुप मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होते. केव्हांही वीज वाहून नेण्यासाठी कोणतेतरी साधन असणें जरूरी चे असते आणि ते म्हणजे ज्या मधून वीज प्रवाहीत होईल असे पाहीजे. परंतु आकाशात वीजनिर्मिती झाल्यावर येथे एकमेव अपवाद आहे की कोणत्याही वस्तु बगैर वीज आपोआप अती जलद गतीने जमिनीच्या दिशेने प्रवाहित होते. त्यांचे कारण म्हणजे आकाशातील निर्माण झालेल्या वीजेला पृथ्वी च्या गुरुत्वाकर्षण शक्ती मुळे आपोआप जमीने कडे ओढल्या जाते. परंतु जमीनीवर येताना जो उंच भाग व ज्या मधून वीजेच्या प्रवाहाला जाण्यासाठी सोपा मार्ग असेल त्या कडे वीज आकर्षित होऊन त्याचा मार्फत ती वीज जमीनीत प्रवेश करते. जसे की हीरवे झाड तथा उंच धातू चा खांब , लोखंडी शेड, अथवा इलेक्ट्रिकल उपकरणे, मोबाईल अशा अनेक वस्तू. म्हणून जेव्हा आकाशात वीज कडाडत असल्यास कधी ही झाडा खाली अथवा टिन शेड खाली उभे राहु नये. अशा वेळी खुल्या जागेत मोबाईलचा वापर करू नये. शक्यतो टिव्ही, लॅपटॉप तथा इलेक्ट्रिकल उपकरणे वापरण्याचे टाळावे.तसेच जर आपण शेतात अथवा खुल्या मैदानात असले असल्यास खुल्या जागेत लहान मुले जसे रांगतात त्या अवस्थेत निश्चिंतपणे पडून राहावे. जर जवळपास पक्के बांधकाम, इमारत असल्यास त्याचा सहारा घ्यावा. जनावरांच्या बाबतीत ही हीच गोष्ट लागु पडते त्यांना झाडाला बांधून ठेऊ नये. शक्यतोवर अशा वेळी टूव्हीलर चा अथवा अन्य कुठलाही वाहनाचा प्रवास करणे टाळावे. आकाशातून येणाऱ्या वीजेचे व्होल्टेज खुप जास्त प्रमाणात असते. आपल्या मनात शंका निर्माण होईल वीज कधी ही कोणत्याही धार्मिक स्थळे अथवा कळसा वर का पडत नसावीत. सहसा सर्व धार्मिक स्थळांचे कळस हे अर्थंग करून जमीनीशी जोडेले असतात. जर लोखंडी अथवा धातू चे कळस असल्यास त्या मधून वीज प्रवाहीत होण्यासाठी सोपा मार्ग मिळून जातो त्या मुळे त्या कळसाला कोणत्याही प्रकारची हानी पहुचत नाही. पुढच्या भागात आपण पाहू इलेक्ट्रिकल करंट लागल्या व त्या व्यक्तीचा जीव कसा तिथल्या तिथे प्रथमोपचार करून वाचविता येते. तसेच इलेक्ट्रिकल करंट लागु नये म्हणून पावसाळ्यात काय काय काळजी घ्यावी व आपला तथा आपल्या परीजनाचा जीव कसा वाचवावे.तरीही व्यक्तिगत मोफत या बाबतीत माहिती व काही सहकार्य पाहीजे असल्यास संपर्क साधावा. लेखक-राजेंद्रसिंघ नौनिहालसिंघ शाहू इलेक्ट्रिकल ट्रैनंर,जया इलेक्ट्रिकल ॲड एजन्सी, पटीयाला शॉप न 2 , संत बाबा निधान सिंघ जी चौक, जी जी रोड गुरूद्वारा चौरस्ता रोज सकाळी 10 ते 12 संपर्क करून येणें 7700063999*
More Related Articles
नुकसानीची पूर्वसूचना 72 तासाच्या आत विमा कंपनीस कळवावी : जिल्हाधिकारी
नांदेड :- भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट अंदाज आहे. नांदेड जिल्ह्यात…
बिज प्रक्रिया संच अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड – शेतकरी उत्पादक संघ, कंपनी (एफपीओ/एफपीसी) यांच्याकडून अटी व शर्तीच्या आधीन राहून अर्ज मागविण्यात…
सोयाबीन उत्पादकांनी डीएपी खताची उपलब्धता नसल्यास सुपर फॉस्फेट व युरिया वापरावा
*कृषी विभागाचे पर्यायी खत वापरण्याचे आवाहन* नांदेड :- जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादकांची संख्या मोठी असून बाजारामध्ये…