नांदेड- येथील सप्तरंग सेवाभावी संस्था दरवर्षी दोन मोठे सांस्कृतिक महोत्सव भरवतो एक नांदेड येथे दुसरा परदेशात दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये आयोजित करत असतात यंदाचा आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सव बँकॉक थायलंड येथे 31 मे 2024 रोजी मोठ्या जल्लोषात आयोजित करण्यात आला. सप्तरंग सेवाभावी संस्था लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स व स्वामी विवेकानंदा सांस्कृतिक केंद्र बँकॉक व संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या साह्याने आयोजित करण्यात आला होता.
सदरील कार्यक्रम भारत दुतावास चे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र यांच्या सभागृहामध्ये सायंकाळी सहा वाजता विविध मान्यवर व प्रेक्षकांच्या उपस्थितीत कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमात शास्त्रीय, उपशास्त्रीय लोकनृत्य व समूह नृत्य, गायन अशा विविध पैलूंचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय दूतावासचे स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र याचे संचालक डॉ. चैतन्य प्रकाश योगी, सप्तरंग सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष डॉ. सान्वी जेठवाणी व विविध मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आला. यानंतर अमेरिकेतील मधुरम खत्री यांनी राम आयेंगे या गीताने कार्यक्रमाला सुरुवात केली, तर कला श्रम उदयपूर यांच्या वतीने कथ्थक उपशास्त्रीय व राजस्थानी लोकनृत्याचे सादरीकरण करण्यात आले त्याबरोबर आसाम येथील लोककलावंत मोमी दास यांनी बिहू नृत्य सादरीकरण केलं मुंबई येथील डॉ. शिभा सुभाष यांचे नटराजा इन्स्टिट्यूट यांनी भरतनाट्यम कला प्रकारात दश अवतार सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यासोबत नांदेड येथील सुधांशू सामलेटी यांना कृष्ण राधा रासलीला सादरीकरण केलं व पुणे येथील डिंबळे परिवाराने नटरंग उभा या उपशास्त्रीय शैलीत नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
श्री योगी यांनी कार्यक्रमाचे प्रशंसा करून अशा कार्यक्रमाने भारतीय संस्कृती जिवंत राहील व अनेक देशांमध्ये सप्तरंग हा कार्यक्रम भरत राहो हीच प्रार्थना आणि आशीर्वाद देत या कार्यक्रमामध्ये त्यांनी भाष्य केलं. डॉ. सान्वी जेठवाणी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले व सदरील कार्यक्रम भारतीय संस्कृतीचा प्रसार व्हावं या हेतूने अनेक देशांमध्ये गेल्या सात वर्षापासून आयोजित करत असल्याचं सांगितलं व भारत येथे आमच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावे असे देखील सर्वांना आवाहन केले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी संस्थेचे सचिव श्री अक्षय कदम यांनी सर्व मान्यवर व सादरीकरण करणाऱ्यांचे आभार मानले. सर्व कलावंतांचे प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह व मान्यवरांना शाल सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आयटीसी ट्रिप्स चे केदार नांदेडकर व रितू धवन यांनी अथक परिश्रम घेतले यासोबत वैभव नाईक व राधिक नाईक यांनी देखील मदत केली.