नांदेड (जिमाका) – माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेचा निकाल 27 मे 2024 रोजी जाहीर झाला आहे.
मार्च 2024 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना मंगळवार 11 जून 2024 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. याबाबत विभागीय मंडळामार्फत सर्व माध्यमिक शाळांना सूचित करण्यात आलेले आहे. याबाबत विभागीय मंडळ कार्यक्षेत्रातील सर्व मुख्याध्यापक , विद्यार्थी व पालकांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केले आहे.