नांदेड(प्रतिनिधी)-सन 2021 मध्ये नांदेड येथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश या पदावर कार्यरत झालेले न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी आपला तीन वर्षाचा कार्यकाळ आता पुर्ण केला असून 3 जून रोजी ते नवीन बदलीच्या ठिकाणी जाणार आहेत. या तिन वर्षाच्या कालखंडात त्यांनी 168 जणांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा दिली आणि एकूण 71 लाख 97 हजार 250 रुपये दंड वसुल केला. दंडाच्या रक्कमेतून त्यांनी फिर्यादींना दिलेल्या रक्कमा लाखो रुपयांमध्ये आहेत. या कालखंडात न्यायालयातील सुर्याजी पिसाळ वृत्तीच्या व्यक्तींकडून त्यांना बराच त्रास देण्याचा प्रयत्न सुध्दा झाला. परंतू तो न्यायाधीश बांगर यांनी यशस्वीपणे पेलला.
सन 2021 मध्ये न्यायाधीश एस.ई.बांगर हे नांदेड जिल्ह्यात दुसरे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश या पदावर रुजू झाले. परंतू पुढे न्यायाधीशांच्या बदल्यानुसार ते क्रमंाक 1 वर आले आणि आता बदली होईपर्यंत सुध्दा त्यांचा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश क्रमांक एकच आहे. या तिन वर्षाच्या कालखंडात त्यांनी असंख्य निकाल दिले. त्यातील 45 निकालांमध्ये 163 आरोपींना शिक्षा दिली. सोबतच त्यांना 71 लाख 97 हजार 250 रुपये रोख दंड ठोठावला. दंडाच्या रक्कमेतील लाखो रुपयांची रक्कम त्यांनी फिर्यादींना दिली. सोबत फौजदारी प्रक्रिया संहितेप्रमाणे फिर्यादी/ पिडीत यांना काय आर्थिक मदत देता येते. त्या संदर्भाचे प्रस्ताव विधीसेवा प्राधिकरण नांदेडच्यावतीने नांदेड जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यास सांगितले आहे.
न्यायालयात सुध्दा काही मंडळी सुर्याजी पिसाळ वृत्तीची आहे. त्यांनी एस.ई.बांगर यांच्या प्रतिबंधात्मक निकाल पध्दतीवर अनेकदा आक्षेप नोंदवले. उच्च न्यायालयाकडे अर्ज पाठविले. न्यायालयात शिक्षा देतांना सुधारणात्मक आणि प्रतिबंधात्मक अशा दोनच पध्दती अस्तित्वात आहेत. न्यायाधीश बांगर यांनी नेहमीच प्रतिबंधात्मक विचार सरणीला अनुसरून आपल्या निकालांना जाहीर केलेले आहे. न्यायाधीश बांगर यांनी चालवलेल्या खटल्यांमध्ये खून करणे, फसवणूक करणे, जिवघेणा हल्ला करणे, सरकारी कामात अडथळा करणे, अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधात्मक कायद्याची खटले तसेच लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दाखल केलेले खटले यांचा प्रामुख्याने समावेश होता. आपल्या बद्दल लोक काय म्हणतील याची चिंता न करता न्यायाधीश बांगर यांनी आपले काम करणे हीच आपली जबाबदारी आहे हे लक्षात ठेवले आणि कधीच त्याला विसरलेले नाहीत.
3 जून रोजी न्यायाधीश बांगर आपल्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी जाणार आहेत. त्यांची नियुक्ती मुंबई महानगरात दिवाणी विभागातील महानगर न्यायाधीश या पदावर झाली आहे. नांदेड जिल्ह्याचे जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.रणजित देशमुख यांनी वास्तव न्युज लाईव्हला झालेल्या 45 निकालांची माहिती जमा करण्यात मदत केली. न्यायाधीश बांगर हे नांदेडहून गेले तरी नांदेड जिल्ह्यातील जनता त्यांना लवकर विसरणार नाही असे म्हणावे वाटते.
न्यायदानाच्या कामासह उच्च न्यायालयाने न्यायाधीश एस.ई.बांगर यांना नांदेड जिल्ह्यातील शाळामध्ये उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांसाठीच्या सर्व भौतिक सुविधा तपासण्याची जबाबदारी दिली होती. आपले न्यायदानाचे काम दुपारी 2 वाजेपर्यंत पुर्ण करून काही महिन्यांमध्ये न्यायाधीश बांगर यांनी उच्च न्यायालयाने दिलेली जबाबदारी सुध्दा पुर्ण केली. नांदेड जिल्ह्यातील माहुर गडावर असलेल्या रेणुका माता मंदिराचे प्रशासकीय विश्र्वस्त नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आहेत. पण अनेकदा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुट्टीवर असतांना न्यायाधीश एस.ई.बांगर यांच्याकडे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पदाचा अतिरिक्त कार्यभार असतांना त्यांनी आई रेणुकेच्या ंदिराची कामकाजाची बारकाईने तपासणी करून योग्य सुचना दिल्या होत्या.
न्यायाधीश एस.ई.बांगर यांच्या नावातील एस म्हणजे शशिकांत ज्याच्या कपाळावर चंद्र कोरलेला आहे म्हणजे तो व्यक्ती शशिकांत. महादेवाचे एक नाव शशिकांत पण आहे. नांदेड जिल्ह्यात कार्यरत असतांना काही समाज विघातकांनी धमकीचा प्रकार सुध्दा लेखी स्वरुपात अंमलात आणला होता. याची माहिती मिळताच योगेश्र्वराने आपल्या दलातील काही युवकांना त्यांच्या सुरक्षेत लावले. एका आरोपीने सुरू असलेल्या न्यायालयात एकदा अभद्र व्यवहार केला होता.त्याला अत्यंत हसतमुखाने उत्तर देत न्यायाधीश एस.ई.बांगर यांनी त्वरीत प्रभावाने शिक्षा ठोठावली होती. हा असला प्रकार नांदेड जिल्ह्याच्या न्यायदान प्रक्रियेत पहिल्यांदाच घडला होता असे न्यायालयातील लोक सांगतात. येत्या सोमवारी न्यायाधीश एस.ई.बांगर नांदेड जिल्ह्याला निरोप देतील. वास्तव न्युज लाईव्ह परिवाराच्यावतीने न्यायाधीश एस.ई.बांगर यांच्या भविष्यातील जीवनासाठी आणि उत्कृष्ट कार्यासाठी “गरीबांचे आश्रु पुसण्यासाठी आपले हात नेहमी बळकट राहावे ‘ या शब्दांसह शुभकामना…
आपण लेख लिहिणारे महाशय महान आहात
आपल्या लेखणीतून आलेले शब्द जणू काही बांगर यांची महिमा वर्णन करणारी आरती म्हणून गावी असे वाटते