नांदेड(प्रतिनिधी)-वेगवेगळ्या बांधकामावरुन पाण्याच्या मोटारी चोरणारा एक चोरटा विमानतळ पोलीसांनी पकडला असून त्याच्याकडून 12 मोटारी पोलीसांनी जप्त केल्या आहेत.
आनंदनगर भागात अजित रामचंद्र जाधव यांचे भुखंड क्रमांक 68 वर दोन मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे.त्या बांधकामाच्या ठिकाणातून विद्युत फिटींगचे काम सुरू असतांना 8 वायर बंडल 58 हजार 500 रुपये किंमतीचे चोरीला गेले होते. या संदर्भाने 20 मे रोजी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार दारासिंग राठोड यांच्याकडे देण्यात आला होता. प्रभारी पोलीस निरिक्षक जे.एन.मोगल, सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष जोंधळे यांच्या मार्गदर्शनात अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर पोलीसांनी आकाश उर्फ भैय्या साईनाथ लंगडे(20) रा.नवा मोंढा यास अटक केली. त्याच्या घराच्या झडतीत चोरलेल्या वायर बंडचे एक बंड सापडले. न्यायालयाने त्यास पोलीस कोठडीत पाठविल्यानंतर त्याने वेगवेगळ्या ठिकाणावरन नळावर लावल्या ाणाऱ्या 12 मोटारी चोरल्याची माहिती समोर आली. त्या जप्त करण्यात आल्या आहेत. या मोटारी ज्यांच्या असतील त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, सहाय्यक पोलीस अधिक्षक किरितिका सीएम यांनी विमानतळ पोलीस पथकातील पोलीस निरिक्षक जे.एन.मोगल, सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष जोंधळे, दारासिंग राठोड, शेख जावेद, किशन चिंतोरे, शेख शोयब, राजेश माने, भोसीकर, साईनाथ सोनसळे आदींचे कौतुक केले आहे.