नांदेड, (प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा न्यायालय येथे अभिवक्ता संघातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. उमेश मेगदे,प्रमुख पाहुणे जिल्हा सरकारी अभियोक्ता अँड.रणजित देशमुख,प्रमुख वक्ते अँड.कपाळे यांनी सावरकर यांनी स्वातंत्र चळवळीमध्ये कसे योगदान दिले याची माहिती दिली. तसेच सावरकर हे चाफेकर बंधू याच्या देश कार्य व त्याचे बलिदान पाहून प्रेरित होऊन पूर्ण जीवन स्वातंत्रासाठी वाहुन दिलेचे सांगीतले.तसेच अँड रणजित देशमुख यांनी पण स्वातंत्र विर सावरकर यांच्या कार्याबाबत सांगीतले.
या कार्यक्रमात अँड.जयंत कुत॔डीकर, अँड.सोनारीकर, अँड.कापसे, अँड.अनुप पांडे, सरकारी वकील अँड.मनिकुमारी बत्तुला, अँड. मिलींद एकताटे, अँड.योगेश पाटील, अँड.गहीलोत मॅडम, अँड.मोहन बंनटे, अँड.नितीन कागणे, अँड.कदम, आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड.माणिक वाखरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अँड.नरंगले यांनी मानले.