8 लाख 73 हजार शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे सादर; उर्वरित मदतीसाठी तांत्रिक पूर्तता आवश्यक नांदेड (जिमाका) – दुष्काळ 2026 अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 8 लाख 73 हजार 31 शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे सादर करण्यात आली आहे. त्यापैकी 5 लाख 68 हजार 220 शेतकऱ्यांना शासनस्तरावरून थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने अग्रीम अनुदान अदा करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या अनुदानाबाबत शासनाकडून प्राप्त लाभार्थी माहिती, पात्रता निकष आणि बँक खात्याशी संबंधित तांत्रिक बाबींची पूर्तता महत्त्वाची असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सामाईक खातेदारांपैकी एका खातेदारालाच मदत देय आहे. तसेच एकाच खातेदाराची एकापेक्षा अधिक गटांत, गावांत, तालुक्यांत किंवा जिल्ह्यांत जमीन असल्यास त्याला एकदाच मदत मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत काही प्रमाणात तफावत येऊ शकते. सामाईक क्षेत्रातील तसेच अकृषिक क्षेत्रातील अपात्र लाभार्थी शासनाच्या निकषांनुसार प्राप्त माहितीच्या आधारे वगळण्यात आले आहेत. जिल्ह्यात जवळपास 1.36 लाख अकृषिक खातेदार आहेत. त्यांना सदर मदत देय ठरत नाही. ज्या शेतकऱ्यांच्या नोंदी योग्य आहेत; मात्र त्यांच्या बँक खात्याला आधार संलग्न नसणे, आधार अद्ययावत नसणे, ई-केवायसी पूर्ण नसणे किंवा आधार संलग्नीकरण (सीडिंग) न झाल्यामुळे तसेच थेट लाभ हस्तांतरणाची (डीबीटी) सुविधा सक्रिय नसल्यामुळे अनुदान जमा होण्यात अडचणी येत आहेत. अशा प्रकरणांत शासनाने जमा केलेली मदत तांत्रिक कारणास्तव तात्पुरती स्थगित राहू शकते. बँक खात्याला आधार संलग्न करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अनुदानाची रक्कम अदा होऊ शकते. त्यामुळे प्रलंबित अनुदान असलेल्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार संलग्नीकरण आणि डीबीटी सुविधा सक्रिय असल्याची खात्री करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 23 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेडमध्ये जातीअंत संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य अधिवेशन उत्साहात संपन्न; राज्य कार्यकारिणीची निवड