कुलूप तोडून चोरट्यांनी मारला डल्ला; १ लाख २३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील वामननगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख २३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वामननगर येथे ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजेपासून ते १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजेपर्यंतच्या कालावधीत ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून पोबारा केला. या प्रकरणी अमोल अनंतराव हाळे (वय ३७, रा. वामननगर, नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६७५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३१ (३), ३३१ (४) आणि ३०५ अन्वये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घरफोडीचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जहागीरदार करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 56 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भोकरमध्ये बारसमोर ७५ हजारांची रोकड हिसकावली; नांदेड व हदगावमध्ये दोन घरफोड्या