नांदेड (प्रतिनिधी) – दिवाळी आणि छठपूजेच्या सणांदरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड ते पटना दरम्यान एकेरी विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रेन ऑन डिमांड अंतर्गत 07611 या क्रमांकाने ही विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. गाडी क्र. 07611 नांदेड–पटना विशेष ही गाडी बुधवार दिनांक 18 नोव्हेंबर 2026 रोजी नांदेड येथून रात्री 21:15 वाजता सुटून पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छीवकी, दिन दयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर मार्गे पटना येथे शुक्रवार दिनांक 20 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 08 :30 वाजता पोहचेल. (एक फेरी) या विशेष गाडीला एकूण 18 डबे असतील. त्यामध्ये स्लीपर क्लास, सामान्य द्वितीय श्रेणी, सामान्य आणि लगेज-कम-ब्रेक व्हॅन डब्यांचा समावेश आहे. Kanthak Suryatal Post Views: 78 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation माझ्याकडे १५ दिवस दुर्लक्ष का? सुप्रीम कोर्टात वकील सरन्यायाधीशांवरच भडकला; भरल्या कोर्टात थेट पात्रतेवर उठवले प्रश्न!